चंद्रपूर : विना परवानगी रस्त्यावर बोअरवेलचे खोदकाम करणाऱ्यावर गुन्हा दाखल  

चंद्रपूर : विना परवानगी रस्त्यावर बोअरवेलचे खोदकाम करणाऱ्यावर गुन्हा दाखल  
चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : चंद्रपूर शहरातील बंगाली कॅम्प परिसरातील उत्तम नगरात सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर महानगरपालिकेच्या परवानगीशिवाय बोअरवेलचे खोदकाम करणाऱ्या कंत्राटदार व घर मालकावर रामनगर पोलीस ठाण्यात मनपाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मनपा उपद्रव शोध पथकास शनिवारी उत्तम नगर येथे अवैधरीत्या बोअरवेलचे काम सुरु असल्याची माहीती मिळाली. पथकाने पाहणी केली असता खोब्रागडे यांच्या मालकीच्या देशी दारू दुकानाजवळ मनपाची कोणतीही पूर्व परवानगी न घेता सार्वजनिक रस्त्यावर बोरींगचे खोदकाम सुरु असल्याचे आढळले. अवैधरीत्या बोअरवेलचे काम करीत असल्याने सार्वजनीक मालमत्तेस नुकसान करीत असल्याचा ठपका ठेऊन काम बंद करण्यात आले. तसेच  दुकानदार व बोअरवेल करवून देणारे कंत्राटदार या दोघांविरुद्ध रामनगर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला.
पाण्यासाठी बोअरवेल खोदण्याचे प्रमाण शहरात मोठ्या प्रमाणात होत आहे. सातत्याने पाण्याची पातळी कमी होत असल्यामुळे होणारी मनपातर्फे बोअरवेल खोदकाम होऊ नये याकरिता प्रयत्न केले जात आहेत. ज्यांच्याकडे विहीर, बोअरवेल आहे त्यांना रेन वॉटर हार्वेस्टींग करणे बंधनकारक करण्यात आले आहे. ठराविक कालावधीत रेन वॉटर हार्वेस्टींग न केल्यास त्यांना २० हजार रुपयांचा दंडाची तरतूद करून दंड आकारण्यात येत आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news