Zero Shadow Day : चंद्रपूरमध्ये उद्या शून्य सावली दिवस; जाणून घ्या केव्हा आणि कुठे 

Zero Shadow Day : चंद्रपूरमध्ये उद्या शून्य सावली दिवस; जाणून घ्या केव्हा आणि कुठे 
Published on
Updated on
चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : शून्य सावली दिवस हा शब्दच कुतूहल निर्माण करणारा आहे. कारण या दिवशी आपली वर्षभर सोबत राहणारी सावली काही मिनिटांसाठी आपली साथ सोडून जाते. तो क्षण आणि दिवस केव्हा आणि कुठे घडतो हे पाहू. चंद्रपूर जिल्ह्यात १८ मे ते २३ मे पर्यंत शून्य सावली दिवसाचा अनुभव घेता येईल. १८ मे-पाटण, विरुर,ढाबा, गोंडपिंपरि, १९ मे-राजुरा, कोरपना, गडचांदूर, पोंभुरणा, कोठारी, राजुरा, बल्लारपूर, २० मे-मूल,सावली,चंद्रपुर, घुग्गुस,भद्रावती,माजरी, २१ मे-वरोरा,सिंदेवाही, चंदनखेडा,शेगाव,मोहोर्ली, २२ मे-चिमूर, नेरी, कोलारा, 23 मे-ब्रम्हपुरी,भिसी, नागभीड येथे पाहत अनुभवता (Zero Shadow Day )

एकाच ठिकाणावरून दोन दिवस शून्य सावली

सूर्याचा उत्तरायण आणि दक्षिणायन असा भासमान मार्ग पृथ्वीच्या  २३.५०° दक्षिण आणि उत्तरेकडे असतो म्हणजेच कर्कवृत्त आणि मकरवृत्त या दरम्यान असणाऱ्या सर्व भूभागावर सूर्य वर्षातून दोनदा दुपारी डोक्यावर येतो आणि दोनदा शून्य सावली दिवस येतात. उत्तरायण होताना एकदा आणि दक्षिणायण होताना एकदा. तसेच सूर्य दर रोज ०.५० ° सरकतो म्हणजे तो एकाच अक्षवृत्तावर २ दिवस राहतो, त्यामुळे एकाच ठिकाणावरून दोन दिवस शून्य सावली अनुभवता येऊ शकते. (Zero Shadow Day)
भारताचा विचार केल्यास अंदमान-निकोबार बेटावर इंदिरा पॉइंट येथे ६.७८° अक्षवृत्तावर ६ एप्रिल आणि ५ सप्टेंबर रोजी दुपारी सूर्य अगदी डोक्यावर असतो आणि शून्य सावली दिवस घडतो. पुढे १० एप्रिल आणि १ सप्टेंबर रोजी कन्याकुमारी येथे शून्य सावली दिवस येतो तो दक्षिण भारतात तेलंगणा येथे २ मे पर्यंत विविध अक्षवृत्तावर असलेल्या शहरात शून्य सावली दिवस पाहता येतो.
महाराष्ट्रात ३ मे ते ३१ मे पर्यंत शून्य सावली दिवस येतात. कोल्हापूर जिल्ह्यातील  सावंतवाडी येथे ३ मे रोजी तर  धुळे जिल्ह्यात ३१ मे रोजी शून्य सावली दिवस अनुभवता येतो. भारतातून शेवटी मध्यप्रदेशातील भोपाळ जवळून २३.५०° अंशावरून कर्कवृत गेले आहे. त्यामुळे शून्य सावलीचा हा भारतातील शेवटचा भूभाग आहे. भारतात २३.५० अंशाच्या पुढे दिल्ली, हिमाचल, काश्मीर कुठेही शून्य सावली घडत नाही.

Zero Shadow Day : महाराष्ट्रातील शून्य सावली दिवस

महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात १५.६° अक्षांश ते धुळे जिल्यात २१.९८ ° अक्षांश या दरम्यान शून्य सावली दिवस पाहता येणार आहे. एका अक्षांशावर येणाऱ्या सर्व परिसरात त्याच दिवशीं शून्य सावली दिवस येतात. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या अक्षवृत्तावर वेगळे दिवस आणि वेळा आहेत. त्यामुळे सर्व शहरे आणि गावांच्या वेळात काही सेकंदांचा फरक आहे. त्यामुळे आपण दुपारी १२.०० ते १२.३५ या वेळा दरम्यान सूर्य निरीक्षण करावे. समूहासाठी उपक्रम करायचा असेल तर मोकळ्या जागी आणि कौटुंबिक निरीक्षण करायचे असेल तर घराच्या छतावर किंवा अंगणात करता येईल, अशी माहिती स्काय वॉच गृपचे  अध्यक्ष तथा खगोलीय अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी दिली आहे.

कसे करावे निरीक्षण

याकरिता दोन,तीन इंच व्यासाचा ,एक दोन फूट उंचीचा पोकळ प्लास्टिक पाईप घ्यावा. कोणतीही उभी वस्तू,मनुष्य उन्हात सरळ उभी ठेवावी. सूर्य अगदी डोक्यावर आला की सावली दिसत नाही.

Zero Shadow Day : विदर्भातील शून्य सावली दिवस

(वेळा-पूर्वेकडून १२.०५ ते पश्चिमेकडील रेखावृत्तावर १२.३०,एकाच ठिकाणी २ दिवस हा अनुभव घेता येईल)
  • १७ मे : अहेरी, आल्लापल्ली
  • १८ मे : मूलचेरा
  • १९ मे : गोंडपिंपरी, बल्लारशाह
  • २० मे : चंद्रपुर (१२.०९), वाशिम (१२.१८) मुकुटबन, पांढरकवडा, झरी,वणी, दिग्रस, लोणार
  • २१ मे : गडचिरोरी (१२.०६) ,सिंदेवाही, वरोरा,घाटंजी, मेहकर
  • २२ मे : यवतमाळ (१२.१४), बुलढाणा (१२.२२),आरमोरी, चिमूर
  • २३ मे : अकोला(१२.१८) हिंगणघाट, ब्रम्हपुरी, नागभीड,कुरखेडा, देसाईगंज,रामटेक.
  • २४ मे : वर्धा (१२.१२) शेगाव, पुलगाव
  • २५मे : अमरावती(१२.१०), दर्यापूर
  • २६ मे : नागपूर (१२.१०), आकोट, भंडारा (१२.०८),
  • २७ मे : तुमसर, परतवाडा, रामटेक
  • २८ मे : गोंदिया (१२.०६)
हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news