विदर्भ

Amravati Legislative Council Election : काँग्रेसमध्ये फडकले बंडाचे निशाण

अविनाश सुतार

अमरावती, पुढारी वृत्तसेवा: अमरावती विभागीय पदवीधर मतदार संघासाठी (Amravati Legislative Council Election) काँग्रेसने शिवसेनेचा (ठाकरे गट) उमेदवार आयात करून बुलढाण्याच्या धीरज लिंगाडे यांना उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर काँग्रेसमध्ये बंडाचे निशाण फडकायला सुरुवात झाली आहे. काँग्रेसच्या पदवीधर सेलचे अध्यक्ष श्याम जगमोहन प्रजापती यांनी बंड करत आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा शहराध्यक्ष बबलू शेखावत यांना पाठवला आहे. अध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त करत आपण काँग्रेसचा सच्चा कार्यकर्ता म्हणून कार्यरत राहणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी (Amravati Legislative Council Election) काँग्रेसच्या पदवीधर सेलचे अध्यक्ष शाम जगमोहन प्रजापती यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली होती. त्यांच्यासोबतच माजी मंत्री डॉ. सुनील देशमुख, माजी महापौर मिलिंद चिमोटे, अकोल्याचे डॉ. सुधीर ढोणे, यवतमाळचे डॉ. महेंद्र लोढा, भैयासाहेब मेटकर यांनीही उमेदवारी मागितल्याचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले होते. मात्र, काँग्रेसने अनेक वर्षांपासून पक्षात असणाऱ्या उमेदवारांना डावलून बुलढाण्याचे शिवसेना ठाकरे गटाचे धीरज लिंगाडे यांना उमेदवारी जाहीर केली.

त्यामुळे काँग्रेसमधील एक मोठा गट या निर्णयाने नाराज झाला आहे. काँग्रेसमध्ये आता अंतर्गत कलहाला सुरुवात झाली असून त्या कलहाचा उद्रेक श्याम प्रजापती यांच्या राजीनामे होत असल्याचे पाहायला मिळत आहे. प्रजापती यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा बुधवारी शहराध्यक्ष बबलू शेखावत यांच्याकडे पाठवला आहे. या राजीनामा पत्रात त्यांनी पदवीधरांचे प्रश्न शासन दरबारी मांडून सोडवण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न केला. मात्र आपण काही कारणास्तव राजीनामा देत असल्याचे नमूद केले. मी काँग्रेसचा प्रामाणिक कार्यकर्ता असून शेवटपर्यंत काँग्रेसच्या विचारांशी प्रामाणिक राहील, असेही त्यांनी पत्रात म्हटले आहे.

Amravati Legislative Council Election : का दिला राजीनामा?

काँग्रेस पक्षाकडे पक्षातील सहा जणांनी उमेदवारी मागितली होती. मात्र, यातील काँग्रेसने कोणालाही उमेदवारी न देता बुलढाणा येथील धीरज लिंगाडे यांचे नाव अनपेक्षितपणे जाहीर केले. त्यामुळे काँग्रेसशी प्रामाणिक असलेला एक मोठा वर्ग पक्षाच्या या निर्णयावर नाखुश आहे. या निर्णयाबद्दल तीव्र नाराजी असल्याचेही समोर येत आहे. या निर्णयाचा परिणाम म्हणून श्याम प्रजापती यांनी आपल्या पदवीधर सेलचे अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.

हेही वाचलंत का ? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT