भंडारा; पुढारी वृत्तसेवा: कारवाई करण्यासाठी गेलेल्या उपविभागीय अधिकारी रवींद्र राठोड यांच्यावर बुधवारी पहाटे वाळू तस्करांनी हल्ला केला होता. संशयित आराेपींना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांनी तस्करांसोबत 'मटण पार्टी' केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने पोलिस दलात खळबळ माजली आहे.
' मी तुमसर पोलिस ठाण्यात असताना अनेक आरोपींची नावे काढून टाकली आहेत. ही तर किरकोळ बाब आहे ' असे पवनी पोलिस ठाण्यातील एक हवालदार सांगताना दिसत आहे. हा व्हिडीओ उमरेडजवळच्या एका धाब्यावरील असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे वाळू तस्करांसोबत पोलिसांचे असणारे लागेबांधे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
या व्हिडिओमुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर वरिष्ठ पोलिस अधिकारी पवनी पोलिस ठाण्यात दाखल झाल्याची माहिती मिळत आहे.
हेही वाचलंत का?