विदर्भ

नागपूर : दीड किलो सोन्यासह १३ लाखांची रोकड पळवली; पोलिसांसमोर आव्हान

अनुराधा कोरवी

नागपूर; पुढारी वृत्तसेवा: बंद घर फोडून चोरट्याने दीड किलो सोन्यासह १३ लाखांची रोकड लंपास केल्याने नागपूर पोलिस हादरले आहेत. एक किलो सोन्याचा दर ५२ ते ५३ लाखां रूपयांचे होते. दीड किलो सोने आणि रोख रक्कमेसह सुमारे ९१ ते ९२ कोटींचा ऐवज चोरीला गेल्याने पोलिसांसमोर आव्हान उभे राहिले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शांतीनगर पोलिस ठाण्यातंर्गत येणाऱ्या कश्यपनगर येथील जावेद नामक व्यापारी घराला कुलूप लावून कुटुंबासह बाहेर गेले होते. जाताना त्यांनी सर्व घराचे दरवाजे नीट बंद करून सगळीकडे कुलूपे लावलेली होती. यानंतर मध्यरात्री बाहेरून घरी परत आल्यावर घराचे कुलूप तुटलेले दिसले. जावेद यांनी घरात जाऊन पाहिले असता चोरी झाल्याचे लक्षात आले. यात अज्ञात चोरट्यांनी दीड किलो सोन्यासह १३ लाखांची रोकड लंपास केली आहे.

या घटनेनंतर जावेद यांनी तातडीने शांतीनगर ठाण्यात तक्रार नोंदवली. यानंतर गुन्हे शाखेचे उपायुक्त राजमाने यांच्यासह अनेक पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरूवात केली आहे. या घटनेचा तपास रात्रभर सुरू असून अजून अध्याप अज्ञात चोरांची माहिती मिळालेली नाही.

याच दरम्यान पोलिसांना जवळच्या माणसाने टिप दिल्याचा संशय आहे. या दुष्टीने आणि सीसीटीव्ही फुटेजवरून तपासाला गती देण्यात आली आहे. या घटनेचे गाभीर्य ओळखून तपास सुरू आहे.

हेही वाचलंत का? 

SCROLL FOR NEXT