विदर्भ

नागपूर : चांद्रयानाच्या सुरक्षित लँडिंगसाठी राष्ट्रवादीचे टेकडी गणेशापुढे होम हवन

मोहन कारंडे

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : चांद्रयान- ३ मोहीम आज यशस्वी व्हावी, भारताचा तिरंगा दिमाखाने फडकावा याकरिता देशभरातील नागरिक प्रार्थना करत आहेत. सर्वत्र होम-हवन पूजा सुरू आहेत. यामध्ये राजकीय पक्ष देखील मागे नाहीत. नागपूर येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटातर्फे चांद्रयान मोहीम यशस्वी व्हावी यासाठी गणपती बाप्पाला साकडं घातलं गेलं.

यासाठी टेकडी गणेश मंदिरात विशेष पूजा आयोजित करण्यात आली होती. याशिवाय होम हवन देखील करण्यात आले. भारतीय शास्त्रज्ञानी चांद्रयान मोहिमेसाठी प्रचंड मेहनत घेतली आहे. त्यामुळे संपूर्ण जगाचं लक्ष चांद्रयान मोहिमेकडं लागलं आहे. भारत देश जरी विज्ञान क्षेत्रात भरारी घेत असला तरी चांद्रयान मोहीम यशस्वी व्हावी यासाठी देशवासियांच्या भावनेची धार्मिक जोड आज दिसत आहे. मिशन पूर्ण होईल आणि भारत चंद्रावर तिरंगा झेंडा फडकवेल, असा विश्वास राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रशांत पवार, नागपूर जिल्हाध्यक्ष बाबा गुजर यांनी गणेश चरणी व्यक्त केला. यावेळी विजयकुमार शिंदे, मिलिंद महादेवकर, राजेश माटे आदी उपस्थित होते.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT