National OBC Students 
विदर्भ

राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाची महाज्योतीच्या कार्यालयासमोर निदर्शने

अमृता चौगुले

नागपूर, पुढारी वृत्‍तसेवा : सन २०२२-२३ वर्षातील पोलीस भरती व स्पर्धा पूर्वपरीक्षा (JEE/NEET)चे प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यासाठी राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाचे वतीने महाज्योतीच्या कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.

राज्यात होऊ घातलेल्या पोलीस भरती व (JEE/NEET) चे स्पर्धा पूर्व परीक्षांचे प्रशिक्षण केंद्र प्रत्येक जिल्ह्यात उभारावे, शेतकऱ्यांसाठी शेतात पावसापासून संरक्षणासाठी शेड उभारणीसाठी निधी उपलब्ध करून द्यावा, निविदा प्रक्रियेत ही केंद्रे ओबीसी, व्हीजेएनटी व एसबीसी प्रवर्गीय निवेदिकांनाच बार्टी व सारथी या संस्थांच्या धर्तीवर देण्यात यावीत.  प्रत्येक जिल्ह्यात समन्वयक नेमून कलापथकाद्वारे ग्रामीण भागात महाज्योतीच्या विविध योजनाचा प्रचार प्रसार करण्याची मागणी सुध्दा करण्यात आली. यावेळी राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाचे मोठया संख्येने विद्यार्थी उपस्‍थित होते.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT