नागपूर

इंडिया आघाडीचाच पंतप्रधान होणार : विजय वडेट्टीवार

करण शिंदे

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भारतीय जनता पार्टी सत्तेतून बाहेर होईल आणि इंडिया आघाडीचाच पंतप्रधान होईल. राज्यात भाजपचा सुपडा साफ होईल. तसेच इंडिया आघाडी 35 पेक्षा अधिक जागा महाविकास आघाडी जिंकेल असा दावा विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी (दि.1) नागपुरात माध्यमांशी बोलताना केला.

काँग्रेस तसेच महाविकास आघाडीला मोठ्या प्रमाणात यश मिळेल. आम्ही मतदानानंतर जनतेचे आभार मानण्यासाठी गेलो असता, लोकांचा मोठा जनसमुदाय एकवटत आहे. हे आमच्या विजयाचे प्रतीक असल्याचा दावा वडेट्टीवार यांनी केला. सत्तेचा दुरुपयोग ते कसाही करू शकतील पण आम्हाला विश्वास आहे, आम्हीच सत्तेत येऊ असे स्पष्ट केले. मला वैयक्तिक विचारले तर माझ्या मनातील पीएम राहुल गांधी आहेत पण इंडिया आघाडीत सर्वसंमतीने नाव समोर येईल.

निवडणूक निकालानंतर काँग्रेसचा मोठा गट बाहेर पडणार असल्याचा दावा नितेश राणे यांनी केला. यासंदर्भात सिंधुदुर्ग रत्नागिरीत देखील भाजप पराभूत होत असून नैराश्यातून ते अशी विधाने करीत आहेत. कोण कुठे जाणार हे त्यांनाच विचारा असा टोलाही त्यांनी राणे यांना लगावला. राज्यात दुष्काळाची भीषण परिस्थिती असून सरकार याबाबतीत गंभीर नाही. दुष्काळाची एकंदर परिस्थिती पाहण्यासाठी काँग्रेसचे नेते दुष्काळी दौऱ्यावर जाणार आहेत.

विजय वडेट्टीवार यांच्या अध्यक्षतेखाली नागपुरात काँग्रेसची दुष्काळासंदर्भात विभागीय बैठक पार पडली. या बैठकीत काँग्रेसचे विदर्भातील आजी-माजी खासदार, नेते लोकसभा निवडणूक लढलेले उमेदवार प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी लोकसभा निवडणूक निकाल, मतमोजणीच्या संदर्भातील पूर्व नियोजन याबाबतही चर्चा झाली. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार उद्यापासून पुढील चार दिवस गडचिरोलीसह विदर्भ दौऱ्यावर आहेत.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT