Maharashtra Schools Pudhari
नागपूर

School Reopening Date: शाळांसाठी उन्हाळ्याची सुट्टी वाढणार? राज्यमंत्री पंकज भोयर यांची मोठी माहिती

वाढत्या तापमानामुळे शाळांची उन्हाळ्याची सुट्टी वाढणार? शाळा सुरू होण्याच्या तारखेबाबत राज्यमंत्री पंकज भोयर यांनी नागपुरात मोठी माहिती दिली आहे. सविस्तर वाचा.

पुढारी वृत्तसेवा

Vidarbha School Reopening date

नागपूर: "विदर्भात दिवसेंदिवस तापमान वाढत आहे. १५ जून नंतर देखील तापमान कायम राहीलं तर परिस्थिती पाहून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शाळा सुरू करण्याची तारीख पुढे ढकलण्याचा विचार केला जाईल. या संदर्भात लवकर निर्णय घेऊ," अशी माहिती राज्यमंत्री पंकज भोयर यांनी आज (दि. २३) नागपूर येथे माध्यमांशी बोलताना दिली.

वाढत्या तापमानामुळे विदर्भातील शाळा दरवर्षी ३० जूनपासून सुरू व्हायच्या, मात्र या वर्षी विदर्भासह राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक राज्य मंडळाच्या सर्व शाळा १५ जूनपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र शालेय विभागाकडून वाढत्या तापमानामुळे शाळांची उन्हाळ्याची सुट्टी वाढवण्याची शक्यता आहे.

यावेळी मंत्री भोयर यांनी सांगितले की, "नागपूर विद्यापीठात सर्व परीक्षा सकाळच्या सत्रात घेतल्या जातील. सोबतच केंद्रांची संख्या वाढविण्यात येणार आहे. प्री प्रायमरी स्कूलच रजिस्ट्रेशन शासनाकडे झाले पाहिजे यासंदर्भात कायदा आणण्याची मागणी होती. याबद्दल विभागाने पूर्ण तयारी केली आहे. याचा मसुदा न्याय विभागाकडे मंजुरीसाठी पुण्यात आला आहे. विधी व न्याय विभागाचे अभिप्राय घेऊन येणाऱ्या अधिवेशनात हा प्रायमरी स्कूल रजिस्ट्रेशन कायदा आणण्याचा सरकारचा प्रयत्न राहील, असे त्यांनी सांगितले.

खाजगी क्लासबाबत राज्यमंत्री भोयर म्हणाले की, खासगी कोचिंग क्लासेसवर अंकुश असावा, अशी पालकांच्या वतीने मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे. इतर राज्यात ज्या प्रचलित नियमावली आहे, त्या अनुषंगाने अभ्यास करून आपल्या राज्यात खासगी कोचिंग क्लासेसला नियमावली तयार करण्यासंदर्भात शासन विचार करत असल्याचे त्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT