क्रीडा संकुल भुमीपूजनासाठी उपमुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रिय मंत्री गडकरी Pudhari Photo
नागपूर

६८४ कोटी रुपयांतून नागपुरात अत्याधुनिक स्पोर्ट्स हब : उपमुख्यमंत्री फडणवीस

नागपूरात जागतिक दर्जाचे क्रीडा विद्यापीठ लवकरच

पुढारी वृत्तसेवा

नागपूरच्या क्रीडा क्षेत्राला चालना मिळावी, आंतरराष्ट्रीय पातळीवरचे खेळाडू विदर्भातून घडावेत यासाठी 684 कोटी रुपये निधी आपण उपलब्ध करून दिला असून नागपुरात जागतिक दर्जाचे क्रीडा विद्यापीठ लवकरच साकारू, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले. मानकापूर परिसरातील क्रीडा केंद्राच्या बांधकामाचे कोनशीला अनावरण प्रसंगी ते बोलत होते.बालेवाडीसारख्या क्रीडा सुविधा व प्रशिक्षण नागपुरात हव्यात यासाठी आम्ही प्रयत्नशील होतो याकडे लक्ष वेधले. अध्यक्षस्थानी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी होते.

यावेळी खासदार श्यामकुमार बर्वे, आ. टेकचंद सावरकर, आ. आशिष जयस्वाल, माजी मंत्री सुलेखा कुंभारे मनपा आयुक्त अभिजित चौधरी ,  जिल्हाधिकारी  डॉ. विपीन इटनकर,  क्रीडा उपसंचालक शेखर पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक, क्रिडापटू ओजस देवतळे व मान्यवर उपस्थित होते.केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, स्वप्नवत वाटेल असे हे केंद्र असणार असून नागपुरसाठी ऐतिहासिक दिवस आहे. यावेळी नयन सरडे या खेळाडूला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देवून शुभेच्छा देण्यात आल्या. या खेळाडूची पेरू देशातील लिमा येथे होणाऱ्या वर्ल्ड ज्युनियर ऍथलिटिक्स स्पर्धासाठी निवड झाली.

असे असेल क्रीडा केंद्र

४५० बेडेड (मुला-मुलींसाठी) होस्टेल सुविधा, अद्ययावत जिमनॅशियम सुविधा, प्रशासकीय इमारत, संकुलात येणाऱ्या खेळाडू व नागरिकांसाठी अल्पोपहार व भोजन व्यवस्थेसाठी कॅफेटेरीया सुविधा, सर्व सुविधांसाठी आऊटडोअर व इनडोअर लाईटिंग सिस्टिम, सर्व क्रीडा सुविधांसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा साहित्य, रेनवॉटर हारवेस्टिंग, ग्रीन बिल्डींग रिक्वारमेंट फॅसिलीटी, सिवेज ट्रीटमेंट प्लान, लॅन्डस्केपींग इत्यादी सुविधा निर्माण करून देण्यात येत आहेत. या माध्यमातून आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविणे, नवोदित खेळाडू व पालकांना क्रीडा क्षेत्राबाबत सामुपदेशन व मार्गदर्शन सुविधा, क्रीडापटू घडवण्यासोबतच क्रीडा क्षेत्रातील विविध करिअरच्या संधी व सुविधा उपलब्ध होतील. पुढील 3 वर्षात  हे केंद्र खेळाडूंसाठी उपलब्ध होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT