नागपूर, पुढारी वृत्तसेवा : तीन वर्षापूर्वी खोटया आरोपात अटक केली. खोटी प्रतिज्ञापत्र करून देण्यास सांगितले, असा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करीत चर्चेत आलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज (दि. २) प्रथमच नागपुरातील कार्यक्रमात एका मंचावर आले. मात्र या दोघांनीही सुरक्षित अंतर व संवाद टाळल्याचे पाहायला मिळाले. (Maharashtra Politics)
आरोप-प्रत्यारोप आणि पेन ड्राईव्ह युद्धानंतर नागपुरातील कार्यक्रमात एका मंचावर फडणवीस आणि देशमुख आले. मात्र, या दोघांनीही सुरक्षित अंतर व संवाद टाळल्याचे पहायला मिळाले. आशा सेविका व इतरांचा सुरेश भट सभागृहातील कार्यक्रम तसेच उपमुख्यमंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या नागपूर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत देशमुख उपस्थित होते. (Maharashtra Politics)
न्यायालयाने वैद्यकीय नव्हे, तर मेरिटवर जामीन दिला, असा दावा देशमुख यांनी करीत त्यांच्या पोकळ धमक्यांना आम्ही घाबरत नाही, असा इशारा दिला. तर भाजपची नेते मंडळी अनिल देशमुख यांना परत तुरुंगात पाठविण्याच्या धमक्या देत आहेत, असा आरोप त्यांचे सुपुत्र जि. प. सदस्य सलील देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिला होता. (Maharashtra Politics)