नागपूर

नागपूर : बनावट कागदपत्रांवर RTE प्रवेश, 17 पालकांवर गुन्हा दाखल

करण शिंदे

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : नागपूरमध्ये शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) प्रवेशासाठी बोगस कागदपत्रे दाखल करून प्रवेश मिळवणाऱ्या 17 पालकांविरोधात सीताबर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बोगस कागदपत्रे पुरवलेल्या पालकांनी आपल्या मुलांना अनुदानित किंवा सरकारी शाळांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी बनावट निवासस्थानाचे पुरावे आणि इतर आवश्यक कागदपत्रे सादर केली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. नियमानुसार ही मुलं त्यांच्या शाळेपासून 3 किलोमीटरच्या आत राहत नव्हते, ज्यामुळे आरटीई अंतर्गत प्रवेशासाठी ते पात्र नव्हते.

या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तसेच भविष्यातील अशा घटना टाळण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने एक समिती स्थापन केली आहे. समिती या 17 प्रकरणांचा तपास करेल आणि आवश्यकतेनुसार पुढील कारवाई करेल. दरम्यान, या घटनेमुळे शहरातील आरटीई प्रवेश प्रक्रियेत पारदर्शकता आणि जबाबदारी राखण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.

शिक्षण विभागाने या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करून योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. आरटीई प्रवेश प्रक्रियेत पहिल्या टप्प्यात अतिशय कमी अर्ज आल्यामुळे मुदतवाढ देण्यात आली आहे. दरम्यान न्यायालयानेही या घटनेत लक्ष घातल्याने ही प्रवेश प्रक्रिया चर्चेत आली आहे.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT