नागपूर

Nagpur BJP : सुनील केदार, कुणाल राऊतविरोधात भाजप आक्रमक; जि.प. समोर ठिय्या

अविनाश सुतार

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध होऊन न्यायालयाने शिक्षा ठोठावलेल्या कॉंग्रेसचे माजी आमदार सुनील केदार यांचा फोटो नागपूर जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पावर नको, निषेध म्हणून भाजपा सदस्यांनी जिल्हा परिषद सभागृहाबाहेर त्याची होळी केली. निषेधाचा हा सनदशीर मार्ग असताना सत्तापक्षाने भाजपा सदस्यांना जाणीवपूर्वक निलंबित केले. सुनील केदार यांचा जामीन रद्द करा, यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोला काळे फासण्याचा प्रकार कुणाल राऊत यांच्या नेतृत्वाखाली युवक कॉंग्रेसने केला. या निषेधार्थ, नागपूर शहर व जिल्हा भाजपाने आज (दि.५)  जिल्हा परिषदेसमोर ठिय्या आंदोलन केले. कुणाल राऊत यांचा पुतळा जाळून संताप व्यक्त केला. भाजयुमोनेही मोदी यांचा अपमान सहन केला जाणार नाही, असा इशारा दिला. Nagpur BJP

सुनील केदार हे भ्रष्टाचारात दोषी ठरल्याने पाच वर्षाची शिक्षा झाली. ते जामिनावर बाहेर आहेत. गैरफायदा घेत जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना थांबविण्याचे काम सुनील केदार करत आहेत. केदारांनी जामीनाचे उल्लंघन केले आहे. सरकारने कोर्टात जाऊन त्यांचा जामीन रद्द करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. एका भ्रष्टाचाऱ्याचे मुख्य अतिथी म्हणून जिल्हा परिषद शाळेत भाषण करणे कितपत योग्य आहे? लहान-लहान विद्यार्थ्यांसमोर ते काय आदर्श मांडणार आहेत? महिला मेळाव्यात ते काय मार्गदर्शन करणार? असा सवाल माजी आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी उपस्थित केला. सुनील केदारांना कोणत्याही कार्यक्रमात बोलावू नये. अन्यथा जिल्हा परिषद बरखास्त करण्याची मागणी करण्यात येईल याकडे लक्ष त्यांनी वेधले. Nagpur BJP

पंतप्रधान मोदी यांच्या फोटोला काळे फासणाऱ्या काँग्रेसी माथेफिरूंना अटक करून त्यांना शिक्षा व्हावी. तसेच, कोर्टाने शिक्षा ठोठावलेले काँग्रेसचे माजी आमदार सुनील केदार यांची प्रतिमा जिल्हा परिषद कार्यालयातून त्वरित हटवण्यात यावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

यावेळी भाजपाचे जिल्हाप्रमुख सुधाकर कोहळे, आमदार समीर मेघे, आमदार प्रवीण दटके, आमदार सुधीर पारवे, डॉ. मिलिंद माने, मल्लिकार्जुन रेड्डी, डॉ. राजीव पोद्दार, महानगर अध्यक्ष बंटी कुकडे यांच्यासह जिल्ह्यातील भाजपाचे अनेक नेते,पदाधिकारी आणि कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT