PM Modi 
नागपूर

PM Modi : पंतप्रधान बुधवारी यवतमाळमध्ये; शेतकरी नेत्यांना नोटीस

अविनाश सुतार

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : यवतमाळ जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांनी आपले जीवन संपवले आहे. वारंवार निसर्गाची अवकृपा, नापिकीने शेतकरी संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रशासन शेतकऱ्यांच्या पाठीशी नसल्याची ओरड शेतकरी करीत आहेत. दरम्यान, बुधवारी (दि.२८) पंतप्रधान नरेंद्र मोदी यवतमाळ दौऱ्यावर येत आहेत. यावेळी त्यांच्याकडे कैफियत मांडण्याचा प्रयत्न शेतकरी नेते करणार आहेत. PM Modi

परंतु, संबंधित शेतकरी नेत्यांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी हजर राहू नये, अडथळा निर्माण करू नये, अशा नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत. उल्लंघन केल्यास कारवाई करण्याचा इशारा पोलीस प्रशासनाने दिला असल्याची माहिती शेतकरी नेते मनीष जाधव यांनी दिली. PM Modi

रब्बी हंगामात पीक म्हणून चना व गहू आपल्या शेतामध्ये टाकले. मात्र, गारपिटीने अक्षरशः शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आणून शेतकऱ्यांचे पीक नष्ट झाले आहे. वारंवार निसर्गाची अवकृपा, नापिकीने शेतकरी संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रशासन शेतकऱ्यांच्या पाठीशी नसल्याची ओरड शेतकरी करीत आहेत.

लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी विविध विकास कामांच्या उद्घाटन आणि लोकार्पणासाठी बुधवारी यवतमाळ येथे येत आहेत. यवतमाळ -नागपूर रोडवर तळेगाव भारी परिसरात विमानतळापासून रस्त्याच्या दुतर्फा बॅरिकेड उभारण्यात आले आहेत. भव्य तीन चार शामियाने उभारणे अंतिम टप्प्यात आले आहे. हजारो वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. शहर व ग्रामीण भागात पोलिस बंदोबस्तामुळे छावणीचे स्वरूप आले आहे. एकीकडे प्रशासन, भाजप, महायुती पंतप्रधानांच्या दौऱ्यासाठी सज्ज असताना विदर्भावर वादळी पावसाचे सावट, शेतकऱ्यांची नाराजी देखील प्रकर्षाने चर्चेत आहे.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT