पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते साक्रीतील जैताणेच्या ग्रामीण रुग्णालयाचे ई-लोकार्पण | पुढारी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते साक्रीतील जैताणेच्या ग्रामीण रुग्णालयाचे ई-लोकार्पण

धुळे; पुढारी वृत्तसेवा : जैताणे, ता. साक्री येथील नूतन ग्रामीण रुग्णालय इमारतीचा ई-लोकार्पण सोहळा आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राजकोट येथून दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे झाला.

या कार्यक्रमास दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकास व पंचायतराज, पर्यटन मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन, सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री डॉ.तानाजी सावंत, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, तर प्रत्यक्ष कार्यक्रमस्थळी आमदार मंजुळाताई गावित, जिल्हाधिकारी अभिनव गोयल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता, अपर पोलीस अधिक्षक किशोर काळे, जिल्हा परिषदेचे कृषी सभापती हषवर्धन दहिते,जि.प. सदस्य डॉ. नितीन सुर्यवंशी, मुंबईचे आरोग्य उपसंचालक डॉ.नागनाथ मुदम, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.दत्ता देगांवकर, तहसिलदार साहेबराव सोनवणे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन बोडके, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. अभिजीत गोल्हार, ग्रामीण रुग्णालय जैताणेचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.हर्षवर्धन चित्तम, राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे कार्यकारी अभियंता (नाशिक) अंकुश पाटील, कनिष्ठ अभियंता अक्षयकुमार देवरे, उप अभियंता मयुर देवरे ,गट विकास अधिकारी शशिकांत सोनवणे, जैताणे सरपंच कविता मुजगे, माजी सरपंच ईश्वर न्याहळदे, संजय खैरनार हे उपस्थित होते.

यावेळी आमदार मंजुळा गावित म्हणाल्या की, जैताणे येथील ग्रामीण रुग्णालयाच्या या नवीन इमारतीमुळे येथील परिसरातील नागरिकांना 24 तास वेळेवर आरोग्य सुविधा मिळेल. येथील नागरिकांनी या ग्रामीण रुग्णालयाच्या आरोग्य सेवेचा लाभ घ्यावा. येथील कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही नागरिकांना चांगल्या सुविधा द्याव्यात.

जिल्हाधिकारी गोयल म्हणाले की, ग्रामीण भागातील नागरिक हा निरोगी राहीला पाहिजे. बालमृत्यू व मातामृत्यू कमी होण्यासाठी तसेच इतर प्रकारचे संसर्ग व असंसर्गजन्य आजारांवर नागरिकांना त्वरीत उपचारासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान व आरोग्य विभागाच्यावतीने हे ग्रामीण रुग्णालय उभारण्यात आले आहे. या ग्रामीण रुग्णालयामुळे या भागातील 40 ते 50 गावांतील नागरिकांना चांगल्या आरोग्यांच्या सोई सुविधा मिळणार आहे. आरोग्य विभागानेही येथील नागरिकांना दर्जेदार सेवा देण्याचा प्रयत्न करावा. येथील नागरिकांनीही जास्तीत जास्त सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. येथील आरोग्य केंद्रातील रिक्त पदे भरण्याबाबत जिल्हा प्रशासनाच्यावतीने प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

ग्रामीण रुग्णालय जैताणे येथील मुख्य इमारत व निवासस्थान बांधकामासाठी 2102.00 लक्ष इतका निधी खर्च झाला आहे. येथे गरोदर माता तपासणी कक्ष, क्ष-किरण विभाग, औषध भांडार, शवविच्छेदन कक्ष, प्रसुती कक्ष, वैद्यकीय अधिकारी रुम, महिला कक्ष, शस्त्रक्रिया कक्ष, लॅब आदी सुविधा आहेत. यावेळी मान्यवरांच्या हस्ते कोनशिला अनावरण करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांनी ग्रामीण रुग्णालयाची पाहणी केली. कार्यक्रमांचे आभार प्रदर्शन डॉ. देगांवकर यांनी केले. यावेळी आरोग्य विभागातील अधिकारी ,कर्मचारी व परिसरातील ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

Back to top button