Pratap Sarnaik Bhaskar Jadhav Meeting: नागपूरमध्ये आजपासून राज्य विधिमंडळाचं हिवाशी अधिवेशन सुरू झालं आहे. त्यापूर्वीच शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या भास्करराव जाधव यांची तोफ धडाडली. त्यांनी राज्याला अजून विरोधीपक्षनेता नाही यावरून सरकारवर कडक शब्दात टीका केली.
मात्र त्यानंतर ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव आणि शिंदे गटाचे मंत्री प्रताप सरनाईक यांच्या भेटीने नवी चर्चा सुरू झाली आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे 10 मिनिटे चर्चा झाली. विशेष म्हणजे, या भेटीनंतर मंत्री प्रताप सरनाईक यांनी "राज्यात ऑपरेशन टायगर सुरू आहे," असे सूचक विधान केले, ज्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.
भास्कर जाधव आणि प्रताप सरनाईक हे जुने मित्र असून, त्यांनी कोकणातील आमदार म्हणून विधानसभेत अनेक वर्षे एकत्र काम केले आहे. सरनाईक यांनी या भेटीचे कारण स्पष्ट करताना सांगितले की, ही भेट राजकीय नसून मैत्रीपूर्ण होती. सरनाईक म्हणाले, 'भास्कर जाधव मला भेटले, काही चर्चा झाली, काही राजकीय चर्चा झाली. ते माझे जुने मित्र आहेत. 20 वर्ष सभागृहात मी आणि ते एकत्रितपणे काम करत आहोत.'
सरनाईक यांनी भास्करराव जाधव हे जेव्हा नगर विकासचे राज्यमंत्री होते, तेव्हा मी त्यांच्याकडे कामासाठी जायचो. आज मी परिवहन मंत्री आहे. त्यांच्या मतदारसंघामध्ये बसेसचा काही विषय आहे आणि काही नवीन बसेस त्यांना चालू करायच्या आहेत. त्या संदर्भात त्यांनी चर्चा केली. सरनाईक पुढे म्हणाले की, आम्ही चर्चा केली तर कोणाच्या पोटात दुखायची गरज नाही.
सरनाईक यांनी भास्करराव जाधव यांच्या भेटीनंतर केलेली आणि आता सर्वांना तोंडपाठ झालेली आहेत. मात्र प्रताप सरनाईक यांनी याचबरोबर ऑपरेशन टायगसंदर्भात केलेल्या वक्तव्यामुळं अनेक चर्चांना ऊत आला. मात्र सरनाईक यांनी या भेटीचा अन् कथित ऑपरेशन टायगरचा संबंध नाहीये.
सरनाईक म्हणाले, 'शेवटी कसं आहे की, राज्यामध्ये ऑपरेशन टायगर चालूच आहे. त्यामुळे त्याचा आणि याचा काही तुम्ही जुळवायची गरज नाही.'
भास्कर जाधव यांना विरोधी पक्षनेतेपदासाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून (ठाकरे गट) नाव देण्यात आले आहे. मात्र, अद्याप त्यांना हे पद न मिळाल्याने ठाकरे गट आणि महाविकास आघाडीतील नेते आक्रमक झाले आहेत. अशा परिस्थितीत, भास्कर जाधव यांनी थेट सत्ताधारी गटातील मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
आचा जाधवांची ही भेट केवळ कामासाठी होती, की यामागे काही राजकीय समीकरणे दडलेली आहेत, याबद्दल आता उत्सुकता निर्माण झाली आहे.