नागपूर

नागपूर : कुणबी- ओबीसी समाजाच्या आंदोलनाला तेली समाजाचा पाठिंबा

अविनाश सुतार

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : ओबीसीच्या आरक्षणातून मराठा समाजाला आरक्षण देऊ नये, बिहारच्या धर्तीवर ओबीसी समाजाची जातीनिहाय जनगणना करण्यात यावी, संविधान चौक येथे चालू असलेल्या सर्व शाखीय कुणबी ओबीसी समाजाच्या आंदोलनाला तेली समाज संघटनेचा पाठिंबा जाहीर करण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. जवाहर विद्यार्थी गृह सिविल लाईन येथे तेली समाजाच्या सर्व संघटनेचे प्रमुख, कार्यकर्ते यांची आज (दि.१२) बैठक झाली. यावेळी तीन ठराव पारित करण्यात आले.

बैठकीनंतर संविधान चौकात जाऊन जाहीर पाठिंब्याची प्रत आंदोलकांना देण्यात आली. लगेच नागपूर जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांना ओबीसीच्या आरक्षणातून एक टक्का सुद्धा आरक्षण इतर समाजाला देऊ नये, अशा आशयाचे निवेदन देण्यात आले.

तेली समाजाच्या या बैठकीला सर्वश्री रमेशजी गिरडे, सुभाष घाटे, ईश्वर बाळबुधे, शेखर सावरबांधे, उमेश शाहू, गंपूजी घाटोळे, गंगाधरजी रेवतकर,बळवंत मोरघडे, रवींद्र येनुरकर, कृष्णाजी बेले, मंगला गवरे, रेखा भोंगाडे, विलासजी मुंडले, सतीश देऊळकर, गजानन भजबुजे, मंगेश सातपुते, रामरक्षाजी शाहू, आदी विविध संघटनाचे पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीचे संचालन मंगेश सातपुते यांनी केले. सुभाष घाटे यांनी प्रास्ताविक केले. प्रवीण बावनकुळे यांनी आभार मानले.

या बैठकीला अनेक सामाजिक संघटनेचे पदाधिकारी व मान्यवरांनी आपली भूमिका स्पष्ट करत ओबीसी आंदोलनाला पाठिंबा दिला तसेच यापुढे आंदोलनात सक्रिय सहभागी होण्याची ग्वाही दिली.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT