नागपूर: आंतरभारती आश्रमाचे संस्थापक डॉ. भाऊसाहेब झिटे यांचे निधन | पुढारी

नागपूर: आंतरभारती आश्रमाचे संस्थापक डॉ. भाऊसाहेब झिटे यांचे निधन

नागपूर, पुढारी वृत्तसेवा: अमरावती मार्गावरील दाभा येथील आंतरभारती आश्रमाचे संस्थापक डॉ. भाऊसाहेब झिटे यांचे आज (दि. १२) पहाटे साडेचारच्या सुमारास हृदयविकाराने वयाच्या ९३ व्या वर्षी देहावसान झाले. दाभा येथेच सायंकाळी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

विश्वशांतीसाठी एखाद्या ऋषीप्रमाणे विधायक कार्यासाठी आयुष्यभर त्यांनी स्वत:ला झोकून दिले. अनेकांसाठी ते आधारवड होते.
डॉ. भाऊसाहेब झिटे यांचा जन्म यवतमाळ जिल्ह्यातील पाचगाव येथे सामान्य शेतकरी कुटुंबात २० नोव्हेंबर १९३० रोजी झाला. वर्ध्याच्या न्यू इंग्लिश हायस्कूलमधून त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाले. तरुण वयातच झालेल्या क्षयरोगाच्या इलाजासाठी ते नागपूरच्या डॉ. गुमास्ताकंडे दाखल झाले. उपचारानंतर भाऊ गुमास्ताकंडे डिस्पेंसर म्हणून काम करू लागले.

निःस्वार्थी सेवाभाव हा भाऊंच्या वृत्तीचा स्थायीभाव असल्यामुळे त्यांनी विद्वद्रत्न डॉ. भाऊजी दप्तरी यांनी स्थापन केलेल्या नागपूरच्या होमिओपॅथिक महाविद्यालयातून डीएचबी ही पदवी १९५६ मध्ये घेतली. सन १९५९ मध्ये दाभा येथे एकेकाळी माळरान असलेल्या आजच्या आश्रमाच्या दहा एकर जागेवर आंतरभारती आश्रमाची स्थापना केली.

हेही वाचा 

Back to top button