नागपूर : नागपूर विभागात आतापर्यंत सरासरी 789.5 मिमी पावसाची नोंद झाली असून प्रत्यक्ष 103.53 टक्के असा भंडारा व गोंदिया जिल्हा वगळता विभागात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला आहे. नागपूर विभागात गेल्या 24 तासात 53.5 मिमि पावसाची नोंद झाली असून सर्वाधिक पाऊस गडचिरोली जिल्ह्यात 83.6 मिमी पडला आहे. गोंदिया जिल्ह्यात सर्वात कमी 17 मिमि पावसाची नोंद झाली.
विभागात 762.6 मिमि सरासरी पावसाची नोंद होते. जून ते आतापर्यंत प्रत्यक्ष 789.5 मिमि पाऊस पडला आहे. यामध्ये वर्धा जिल्ह्यात 625.9 मिमि (101.9 टक्के), नागपूर 699.1 मिमि (108.71 टक्के), चंद्रपूर 787.7 मिमि (103.22 टक्के), गडचिरोली 1095.9 मिमि (121.75 टक्के) सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. भंडारा जिल्ह्यात 791.1 मिमि (97.73 टक्के) तसेच गोंदिया जिल्ह्यात 825.8 मिमि (95.87 टक्के) सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला आहे. गतवर्षी विभागात 931.1 मिमी म्हणजेच सरासरी 122.1 टक्के पावसाची नोंद झाली . ऑगस्ट महिन्यात सर्वाधिक पाऊस गडचिरोली जिल्ह्यात 246.4 मिमि, वर्धा जिल्ह्यात 160.6 मिमि, नागपूर 154 मिमि, भंडारा 148 मिमि, गोंदिया 114.7 मिमि तर चंद्रपूर जिल्ह्यात 185.5 मिमि पावसाची नोंद झाली आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली 128 मिमि, कुरखेडा 74.1 मिमि, आरमोरी 157 मिमि, चामोर्शी 51.5, एटापल्ली 73.8 मिमि, धानोरा 73.3 मिमि, वडसा देसाईगंज 155 मिमि, मुलचेरा 69.4 तर भामरागड तालुक्यात 133 मिमि पावसाची नोंद झाली आहे.
गडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस
नागपूर विभागात गेल्या 24 तासात 53.5 मिमी पावसाची नोंद झाली असून सर्वाधिक पाऊस गडचिरोली जिल्ह्यात 83.6 मिमी पडला आहे. गोंदिया जिल्ह्यात सर्वात कमी 17 मिमि पावसाची नोंद झाली. वर्धा जिल्हा 33.6 मिमि, नागपूर 61.2 मिमि, भंडारा 43.4 मिमि तर चंद्रपूर जिल्ह्यात 68 मिमि पावसाची नोंद झाली आहे. विभागात 70 मिमि पेक्षा जास्त पावसाची नोंद नागपूर ग्रामीण 72.5, नरखेड 71.7, सावनेर 76.1, कळमेश्वर 84.2 तर भिवापूर तालुक्यात 108 मिमि पावसाची नोंद झाली आहे. नागपूर शहरात 60 मिमि तर हिंगणा तालुक्यात 65 मिमि पाऊस पडला आहे. भंडारा जिल्ह्यात पवनी येथे 75.6 मिमि, गोंदिया जिल्ह्यात मोरगाव अर्जुनी 83 मिमि, चंद्रपूर जिल्ह्यातील मुल तालुक्यात 82.1 मिमि, चिमूर 72 मिमि, ब्रम्हपूरी 149 मिमि, नागभिड 99.4 मिमि, सावली 97.2 मिमि, पोंभूर्णा 70.4 मिमि पावसाची नोंद झाली आहे.