Chandrapur Rain News | अवघ्या काही मिनिटातच पूराचे पाणी चढले, पाहता पाहता ट्रॅक्टर बुडाला

ट्रॅक्टर पुलावर ठेवणे अंगलट आले : वरोरा तालुक्‍यातील घटना, ट्रॅक्‍टर वाहून जाण्याची शक्‍यता
Chandrapur Rain News
धुण्याकरीता नेलेला ट्रॅक्टर काही वेळातच पुलावरपुराच्या पाण्यात बुडाला Pudhari Photo
Published on
Updated on

चंद्रपूर : जिल्ह्यात काही दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. मागील चोवीस तासांतील मुसळधार पावसामुळे नदी-नाले दुथडी भरून वाहत असून अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. अशाच स्थितीमध्ये धुण्याकरीता नेलेला ट्रॅक्टर काही वेळातच पुलावरपुराच्या पाण्यात बुडाल्याची धक्कादायक घटना वरोरा तालुक्यातील सुर्ला या गावातनू समोर आली आहे.

Chandrapur Rain News
Chandrapur Heavy Rain Damage | मुसळधारेने शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू :चंद्रपूर जिल्ह्यात १,३७८ हेक्टरवरील पिकांचे नुकसान

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या शेतीचा हंगाम सुरू आहे. त्यामुळे शेती हंगामाकरीता ट्रॅक्टरचा उपयोग केला जातो. वरोरा तालुक्यातील सुर्ला गावातील आकाश बारसी यांनी हंगाम झाल्यामुळे गावालगतच्या नाल्यावर ट्रॅक्टर आज मंगळवारी दुपारी नाल्यावर धुण्याकरीता घेऊन गेला. त्यांनी ट्रॅक्टर नाल्यात स्व्चछ केला. त्यानंतर नाल्यावरील पुलावर ट्रॅक्टर ठेवला आणि काही वेळाने ट्रॅक्टर नेण्याचे ठरवून तो गावात गेला.

Chandrapur Rain News
Jalgaon Heavy Rain : अतिवृष्टीमुळे जळगाव जिल्ह्यात दहा हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान

सध्या सुरू असलेल्या संततधार पावसाने नाल्याच्या पाण्याच्या पातळीत प्रचंड वाढ झाली. तो परत ट्रॅक्टर नेण्यासाठी गावातून नाल्यावर आला. बघतात तर काय पुराचे पाणी नाल्यावरील पुलावर चढलेले दिसले. त्या पाण्यामधून ट्रॅक्टर काढणे शक्य नव्हते. या घटनेची माहिती गावात पोहचताच नागरिकांनी घटनास्थळी प्रचंड गर्दी केली नाल्यातील पाण्याचा जोर वाढत असल्याने त्याला ट्रॅक्टर पुलावर बाहेर काढता आले नाही. पुराच्या पाण्याचा जोर वाढत असल्याने पाहता पाहता ट्रॅक्टर बुडू लागला. अवघ्या दहा मिनिटांत इतके वाढले की ट्रॅक्टर पुरात दिसेनासे झाला. सध्या नाल्यावर पुन्हा पुराचे पाणी वाढतच असल्याचे नागरिकांचे म्हणने आहे. या घटनेमुळे ट्रॅक्टर वाहून जाण्याची शक्यता ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news