नागपूर : यापूर्वी 2023 मध्ये महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाला कोणत्याही परिस्थितीत ओबीसीमधून आरक्षण दिले जाणार नाही असे लिखित दिले होते. पुन्हा एकदा शासनाने राष्ट्रीय ओबीसी महासंघाला मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देणार नाही असे लिखित आश्वासन देऊन महासंघाला आश्वस्त करावे तोपर्यंत महासंघाचे साखळी उपोषण सुरूच राहील असा निर्धार आज सोमवारी व्यक्त करण्यात आला.
गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी आज सोमवारी संविधान चौकातील ओबीसी महासंघाच्या उपोषण मंडपाला भेट दिली. ओबीसी आरक्षणाला धक्का लावण्यात येणार नाही अशी शासनाचा प्रतिनिधी म्हणून ग्वाही दिली. रविवारी भाजपच्या ओबीसी आमदार, खासदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नाहक बदनामीविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली.
मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे यांनी मुंबईत 29 ऑगस्ट पासून आंदोलन सुरू केले आहे. मराठा समाजाला कोणत्याही परिस्थितीत सरकारने ओबीसीमधून आरक्षण देऊ नये, यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाने 30 ऑगस्टपासून नागपूर येथील संविधान चौकात बेमुदत साखळी उपोषण सुरू केले आहे. महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे, महासचिव सचिन राजुरकर, याचे प्रमुख उपस्थितीत आज उपोषणाचा तिसरा दिवस आहे.
ओबीसी समाजाच्या संवैधानिक आरक्षणाच्या रक्षणासाठी, राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे संविधान चौकात सुरू करण्यात आलेल्या साखळी उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी श्रीकांत दौलतकार, शाम लेडे, अशोक चिंचे, कविश्वर खडसे, डॉ सुरेश चिकटे, राजु बोचरे, गुणेश्वर आरिकर, गोपाल झाडे, राजकुमार वाळके, डॉ विनोद गावंडे, सुरेश कुथे, गेमराज गोमासे हे उपोषणाला बसले आहेत. आम्हाला शासनाकडून लेखी मिळणार नाही तोवर ओबीसी समाज थांबणार नाही असे डॉ. बबनराव तायवाडे यांनी स्पष्ट केले.
रामदास मसराम आरमोरी. भाजप आमदार कृष्णा खोपडे, माजी आमदार सेवक वाघाये तसेच या आंदोलनाला तिरळे कुणबी समाज संघटना, अखिल भारतीय सर्व वर्गीय कलार समाज संघटनेचे, भुषण दडवे, विदर्भ माध्यमिक संघाचे अनिल गोतमारे यांनी पाठिंब्याचे पत्र दिले. माजी नगरसेवक प्रकाश भोयर भाजप ओबीसी सेलचे विदर्भाचे प्रा. प्रकाश बगमारे यांनी पाठिंबा दिला. सहसचिव शरद वानखेडे, परमेश्वर राऊत, शकील पटेल, शंकर मौर्य, निखिल भुते, नाना झोडे, विनोद इंगोले, वृषभ राऊत राहुल करांगडे, निलेश कोढे, दीपक कारेमोरे, रितेश कडव, श्रीकांत मसमारे, अनंत बारसागडे इत्यादींचा सहभाग होता.