रामगीरी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गिनिज वर्ल्ड रेकार्डचे भारतातील प्रतिनिधी स्वप्नील डोंगरीकर यांनी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांना गिनिज वर्ल्ड रेकार्डमध्ये नोंद झाल्याचे प्रमाणपत्र प्रदान केले. (Pudhari Photo)
नागपूर

Guinness Book Of World Record | गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकार्डमध्ये मेट्रोचा डबल डेकर उड्डाणपूल, मुख्यमंत्र्यांनी केली प्रशंसा...

Nagpur Metro Double Decker Flyover | महामेट्रोने अल्पावधीत जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांचा विकास केल्यामुळे नागपूर शहराला जागतिक ओळख मिळाली आहे.

पुढारी वृत्तसेवा

नागपूर : महामेट्रोने अल्पावधीत जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांचा विकास केल्यामुळे नागपूर शहराला जागतिक ओळख मिळाली आहे. महामेट्रोने कामठी मार्गावरील सर्वात लांब डबल डेकर पुलाची निर्मिती केली असून या डबल डेकर पुलाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकार्डमध्ये नोंद घेतली आहे. जागतिक दर्जाच्या या पुरस्कारामुळे नागपूर हे जगातील उत्कृष्ट पायाभूत शहर म्हणून नवीन ओळख निर्माण झाली असल्याचे गौरवोद्वार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.

या रामगीरी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गिनिज वर्ल्ड रेकार्डचे भारतातील प्रतिनिधी स्वप्नील डोंगरीकर यांनी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांना गिनिज वर्ल्ड रेकार्डमध्ये नोंद झाल्याचे प्रमाणपत्र प्रदान केले.

कामठी मार्गावरील डबल डेकर व्हायाडक्ट (मेट्रो) हा जगातील डबल डेकर व्हायाडक्ट आहे. मेट्रो व हायवे वाहतुकीसाठी ५.६३७ कि.मी. लांबीचा सिंगल कॉलम पिल्लरवर उभा असून हा स्थापत्य कलेचा अदभूत उदाहरण आहे. तंत्रज्ञानाचा उपयोग करुन बांधलेल्या या उड्डाणपुलाची गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकार्डतर्फे नोंद घेतली आहे. यापुर्वी छत्रपतीनगर येथील ३.२ कि.मी. लांबीच्या डबल डक्ट उड्डाणपुलाची निर्मितीसाठी जागतिक स्तरावर नोंद घेण्यात आली होती. वास्तुकलेच्या या निर्मितीमुळे संत्राच्या शहरासोबतच पायाभूत सुविधांचे शहर म्हणून नवीन ओळख मिळाली आहे. या पुरस्काराने नागपूरचा गौरव जागतिक स्तरापर्यंत पोहचला आहे. या डबल डेकर पुलाच्या निर्मितीसोबतच कामठी मार्गावर रेल्वे, महामार्ग वाहतूक तसेच मेट्रो वाहतुकीसाठी जागात प्रथमच अशा प्रकारच्या उड्डाणपुल तयार करण्यात आला आहे. हे जगातील प्रमुख अभियांत्रिकी आश्चर्य आहे. या पुलासाठी १ हजार ६५० टन स्टिलचा वापर करण्यात आला आहे.

तंत्रज्ञानाचा अतुलनिय वापर करुन उड्डाणपुलावर गड्डीगोदाम, कडबीचौक, इंदोरा चौक, नारी रोड, ऑटोमोटीव्ह चौक या पाच मेट्रो स्थानके बांधण्यात आली आहे. हा उड्डाणपुल चार पदरी असून पहिल्या स्तरावर महामार्ग, दुसऱ्या स्तरावर मेट्रो आणि जमिन स्तरावर आधीच असलेला महामार्ग आहे. या उड्डाणपुलामुळे कामठी मार्गावरील प्रचंड वाहतूक कोंडीतून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. यापूर्वी छत्रपती चौकाचा समावेश असलेल्या उड्डाणपुलाला देखील गिनिज वर्ल्ड रेकार्डमध्ये समावेश करण्यात आला आहे.

यावेळी महामेट्रोचे संचालक अनिलकुमार कोकाट, प्रकल्प संचालक राजीव त्यागी, कार्यकारी संचालक नरेश गुरबानी, महाव्यवस्थापक यीन राठोड, विद्यासागर व्यवस्थापक प्रविण मारोती, प्रकाश मुदलियार आदी अधिकारी तसेच गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकार्डचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT