

Contractor Death Unpaid Bills Nagpur
नागपूर: कोट्यवधीची बिले सार्वजनिक बांधकाम खात्याकडे प्रलंबित असल्याच्या कारणावरून एका कंत्राटदराने आज (दि. १) गळफास घेऊन जीवन संपविले. काटोल रोड परिसरातील राज नगर येथील फ्लॅटमध्ये मुन्ना वर्मा नावाच्या ठेकेदाराने करोडोची बिल मिळत नसल्यामुळे नैराश्यातून टोकाचे पाऊल उचलले.
मुन्ना वर्मा यांचा श्री साई असोसिएट्स म्हणून व्यवसाय आहे. त्यांचे दोन हॉटमिक्स प्लांट आहेत. काही दिवसापूर्वीच नागपुरात कंत्राटदारांनी आपल्या प्रलंबित देयकांसाठी आंदोलन केले होते. मुन्ना वर्मा यांची सुमारे 30 ते 40 कोटी रुपये बिल पीडब्लूडीकडे पेंडिग असल्याची माहिती पुढे आली आहे. यामुळे ते गेले काही दिवस नैराश्यात होते. आज त्यांनी अखेर टोकाचा निर्णय घेतला.