नागपूर

OBC Andolan: आंदोलनाच्या १७ व्या दिवशी अनेक संघटनांचा ओबीसी महासंघाला पाठिंबा

अविनाश सुतार

नागपूर : पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने संविधान चौकात सुरू असलेल्या उपोषण आंदोलनाला आज 17 व्या दिवशीही समाज बांधवांनी जोरदार प्रतिसाद दिला. महाराष्ट्र राज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण संघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आपला पाठिंबा दर्शविला. यावेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांना लेखी निवेदन देण्यात आले. (OBC Andolan)

यावेळी संघाचे अध्यक्ष योगेश वागदे, भूषण दळवे, शंकरराव वानखेडे, नागेश पाटील, राम गोविंद खोब्रागडे, मायाताई घोरपडे, राजाभाऊ टाळसाळे, प्रकाश कुंभे, अशोक बागडे, रमेश जनबंधू, शंकर ठेंगणे, अॅड. राजू शेंडे, बी. एन. तायडे आदी पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. (OBC Andolan)

आंदोलनात आज सर्वश्री गणेश नाखले, दौलत शास्त्री, गेमराज गोमासे, डॉ. मनोहर तांबोळकर, प्रा. मनोहर बुटे, विलास गावंडे, रमेश गान, दीपक कडू , अशोक निखाडे, गणराज मोहनीकर, नलिनी करांगळे, वासुदेव बुधवारे, रमेश पिसे, भरत मेघे, संजय कुंड, राजीव गोसावी, सुषमा भड, अभय रोकडे, डॉ.अरुण वराडे, भास्कर भणारे, नरेंद्र फुलकर आज उपोषणाला बसले होते.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी उपोषणातून माघार घेणाऱ्या सर्व शाखीय कुणबी कृती समितीच्या सर्व सदस्यांनी भेट देऊन आंदोलनाला आमचा पाठिंबा असल्याचे जाहीर केले. कृती समितीचे सदस्य प्रामुख्याने पुरुषोत्तम शहाणे, सुरेश गुडधे, जानराव केदार, सुरेश वर्षे, पांडुरंग वाकडे, राजेश काकडे इत्यादी सदस्यांचा समावेश होता. या आंदोलनात राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या विविध अधिकाऱ्यांनी विशेष सहकार्य केले. यामध्ये कल्पनाताई मानकर, शकील भाई पटेल, परमेश्वर राऊत, सुभाष घाटे, नाना सातपुते, ऋतिका डाफ, निलेश कोढे, उज्वला महल्ले, श्रीकांत मसमारे, विनोद हजारे आदी उपस्थित होते.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT