Anil Deshmukh  (Pudhari Photo)
नागपूर

Anil Deshmukh | आमदार चरण ठाकूर यांचे भाऊही दुबार मतदार : अनिल देशमुख यांचा आरोप

Nagpur News | काटोल-नरखेडमध्ये 35 हजार 535 मतांची चोरी

पुढारी वृत्तसेवा

Katol Narkhed constituency vote theft

नागपूर: नागपूर जिल्ह्यातील काटोल-नरखेड मतदारसंघात मतदार यादीमध्ये घोळ करुन 35 हजार 535 मतांची चोरी करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली. आमदारांच्या दोन भावांचेही दुबार मतदान असल्याचे सांगितले.

शेतकरी, व्यापारी, कामगार, नोकरदार, महिला वर्गासह सर्वसामान्य नागरिकांमध्ये भाजपच्या विरोधात प्रचंड नाराजी आहे. लोकसभा निवडणुकीत याचा मोठ्या प्रमाणात फटका भाजपला बसला. यामुळे विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी निवडणूक आयोगाला हाताशी धरून मतदार यादीमध्ये घोळ करून निवडणुका जिंकण्याचे कटकारस्थान भाजप सरकारने रचले असा आरोप केला.

अनेक ठिकाणी मतदार याद्यांमधील घोळ समोर आल्यानंतर काटोल-नरखेड विधानसभेतील मतदार याद्यांची तपासणी करण्यासाठी १३ टीम तयार करण्यात आल्या होत्या. या चमूने तीन महिने मतदार यादीची तपासणी केली असता अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत.

विधानसभा २०१९ ते लोकसभा २०२४ निवडणुकीदरम्यान मतदारांची झालेली वाढ १९५२ इतकी होती.परंतु लोकसभा २०२४ ते विधानसभा २०२४ या पाच महिन्यांच्या कालावधीत ८,४०० मते वाढली. लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या ज्या कार्यकर्त्यांनी मतदान केले त्यांचे व कुटुंबीयांची नावे विधानसभा २०२४ च्या निवडणुकीच्या वेळी मतदार यादीमध्ये नव्हते.

मुलाचे आणि वडिलांचे नाव वेगवेगळे असणे, घर क्रमांक '००' असणे, एकाच व्यक्तीचे नाव शहरातसुद्धा आणि ग्रामीणमध्येसुद्धा आहे. जेणेकरून तो व्यक्ती विधानसभेत दोन ठिकाणी मतदान करू शकेल आणि आगामी नगर परिषदेतही मतदान करू शकेल व जिल्हा परिषद-पंचायत समितीच्या निवडणुकीत मतदान करू शकेल. असे दुबार मतदार हे भाजपचेच कार्यकर्ते आहेत.

काटोलचे आमदार चरण ठाकुर यांचे भाऊ दिलीप व मुन्ना ठाकुर यांचेही दोन ठिकाणी नाव आहे. कोंढाळीचे भाजपाचे पदाधिकारी योगेश शेषरावजी चाफले यांनी सोयीचे आरक्षण येईल तिथून निवडणुक लढविण्यासाठी आपले नाव हे कोंढाळी नगर पंचायतमध्ये सुध्दा टाकले आणि दुधाळा जिल्हा परिषदेसाठी काटेपांजरा या गावात सुध्दा टाकले.

दरम्यान, कोंढाळी येथील नगर पंचायतचे नगराध्यक्ष पदाचे आमच्या पक्षाचे उमेदवार संजय राऊत यांनी कोणताही अर्ज न करता त्यांचे वानाडोंगरी नगर पंचायतमध्ये स्थलांतरीत करण्यात आले. या प्रकरणात एक अहवाल जिल्हाधिकारी यांनी दिला असून त्यांनी संजय राऊत यांनी नाव स्थलांतरासाठी कोणताही अर्ज केला नव्हता. चौकशी करण्यासाठी तहसीलदार हिंगणा यांनी हिंगणा पोलिस स्टेशनला तक्रार सुध्दा दिली आहे.

काटोल-नरखेड विधानसभेला मध्यप्रदेश लागून आहे. यामुळे येथील अनेकांची नावे ही काटोल-नरखेडच्या विधानसभेत टाकण्यात आल्याचे प्रकारसुद्धा समोर आले आहे. मध्यप्रदेश येथील लांगा मधील सरंपच वनिता पराडकर व त्यांचे पती उपसरपंच गणपती पराडकर हे भाजपाचे कार्यकर्ते आहेत. त्यांनीही मतदान केल्याची माहिती अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषदेत पुरव्यासह दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT