Pune Nagpur Vande Bharat: दिवाळीत ‘पुणे-नागपूर वंदे भारत’ची झळाळती कामगिरी

दहा फेऱ्यांमध्ये 145 टक्क्यांहून अधिक प्रवाशांचा प्रतिसाद; रेल्वेला कोटींचे उत्पन्न
Pune Nagpur Vande Bharat: दिवाळीत ‘पुणे-नागपूर वंदे भारत’ची झळाळती कामगिरी
Pune Nagpur Vande Bharat: दिवाळीत ‘पुणे-नागपूर वंदे भारत’ची झळाळती कामगिरीPudhari
Published on
Updated on

पुणे : यंदाच्या दिवाळी हंगामात पुणे रेल्वे विभागात धावणाऱ्या वंदेभारत एक्सप्रेस गाड्यांपैकी पुणे-नागपूर-पुणे वंदेभारत एक्सप्रेसने सर्वाधिक प्रभावी कामगिरी करत, रेल्वेला विक्रमी उत्पन्न मिळवून दिले आहे. दि. 17 ते 28 ऑक्टोबर दरम्यानच्या दहा फेऱ्यांमध्ये या गाडीमध्ये नियमित फेऱ्यांच्या 145 टक्क्यांहून अधिक प्रवाशांनी प्रवास केला. पुण्यातून कोल्हापूर आणि हुबळीसाठी धावणाऱ्या वंदेभारत गाड्यांच्या तुलनेत पुणे-नागपूर-पुणे वंदेभारत रेल्वेला दिवाळीच्या काळात अधिक प्रतिसाद मिळाल्याचे रेल्वे प्रशासनाने जाहीर केलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.(Latest Pune News)

Pune Nagpur Vande Bharat: दिवाळीत ‘पुणे-नागपूर वंदे भारत’ची झळाळती कामगिरी
Roller Hockey Pune: राज्यस्तरीय रोलर हॉकी स्पर्धेसाठी पुणे संघ सज्ज

पुणे-नागपूर वंदेभारत (ट्रेन नं. 26101) ची दमदार कामगिरी

प्रवाशांचा प्रतिसाद : 145 टक्क्यांहून अधिक

प्रवासी संख्या : 7 हजार 721

उत्पन्न : 1 कोटी 8 लाख 91 हजार 252

नागपूर-पुणे वंदेभारतही मागे नाही (ट्रेन नं. 26102)

प्रवाशांचा प्रतिसाद : 125 टक्क्यांहून अधिक

प्रवासी संख्या : 6 हजार 666

उत्पन्न : 91 लाख 72 हजार 669

Pune Nagpur Vande Bharat: दिवाळीत ‘पुणे-नागपूर वंदे भारत’ची झळाळती कामगिरी
Urban Health Commissionerate Maharashtra: राज्याच्या आरोग्य व्यवस्थेला नवे बळ! स्थापन होणार स्वतंत्र ‌‘शहरी आरोग्य आयुक्तालय‌’

दिवाळीच्या काळात पुणे-नागपूर वंदेभारतला मिळालेला 145 टक्क्यांहून अधिक प्रतिसाद अतिशय उत्साहवर्धक आहे. पुणे रेल्वे विभाग नेहमीच प्रवाशांना जलद आणि आरामदायी प्रवासाचा अनुभव देण्यासाठी कटिबद्ध आहे. वंदेभारत ही रेल्वे गाडी प्रीमियम दर्जाची असून, या सेवेचा प्रवाशांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा.

हेमंत कुमार बेहेरा, विभागीय वाणिज्य अधिकारी तथा जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे, पुणे विभाग

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news