कळमेश्वर तालुक्यात साडेतीन हजार हेक्टरचे नुकसान, पंचनाम्यांना वेग  File Photo
नागपूर

Nagpur News : कळमेश्वर तालुक्यात साडेतीन हजार हेक्टरचे नुकसान, पंचनाम्यांना वेग

चंद्रशेखर बावनकुळे उद्या नागपूर दौऱ्यावर

पुढारी वृत्तसेवा

नागपूर : कळमेश्वर तालुक्यातील व तेलकामठी व धापेवाडा मंडळातील गावांमध्ये २६ सप्टेंबरला वादळी वाऱ्यासह अतिवृष्टीसदृश्य झाली. यामुळे तिडंगी,तिष्टी(खु),तिष्टी(बु), तेलगांव , दाढेरा , मांडवी या गावांमध्ये शेतीपिक व संत्रा बागेचे प्रचंड नुकसान झाले.

प्राथमिक अंदाजानुसार, ३४१० हेक्टर क्षेत्रावर नुकसान झाले आहे. उद्या सोमवारी सकाळी महसूलमंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे या भागाचा दौरा करणार आहेत. जिल्हा महसूल प्रशासनाने जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांच्या आदेशानुसार पंचनामे सुरू केले आहेत. गेल्या २ दिवसापासून युध्दपातळीवर पंचनामे सुरू आहेत. नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, कोणीही नुकसान भरपाईपासून वंचित राहू नये, याची दक्षता तालुका प्रशासन घेत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT