Drug Case Pudhari File Photo
नागपूर

Nagpur hotel drug party | गोंदियाच्या तरुणांची नागपुरात हॉटेलमध्ये ड्रग्ज पार्टी, तिघांना अटक

गोंदियाच्या तरुणांची नागपुरात हॉटेलमध्ये ड्रग्ज पार्टी, तिघांना अटक

पुढारी वृत्तसेवा

नागपूर - पोलिसांनी सीताबर्डी रामदासपेठेतील हॉटेल सेंटर पॉईंटमध्ये सुरू असलेल्या ड्रग्ज पार्टीवर छापा टाकून तिघांना अटक केली. हे तिघेही गोंदियातील रहिवासी आहेत.

मयंक अग्रवाल (वय ३०, रा. गणेशनगर), पराग अग्रवाल (वय ३१, रा. सिव्हिल लाइन्स) आणि कुणाल नखाते (वय ३१, सर्व रा. सिव्हिल लाइन्स) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. मंगळवारी तिघेही नागपुरात आले. ते हॉटेल, सेंटर पॉईंटमधील चौथ्या माळ्यावरील खोलीत थांबले. तिघेही एमडीचे सेवन करायला लागले.

याबाबत पोलिस उपायुक्त अन्नपूर्णा सिंग यांना माहिती मिळाली. त्यांनी सीताबर्डी पोलिसांना कारवाईचे निर्देश दिले. सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली सीताबर्डी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुहास चौधरी यांच्या नेतृत्वातील पथकाने मंगळवारी रात्री हॉटेलमध्ये छापा टाकला.

तिघांना एमडीचे सेवन करताना रंगेहाथ अटक केली. त्यांच्याकडून १.६४० ग्रॅम एमडी जप्त केली. त्यांनी गोंदियातील तस्कराकडून अडीच ग्रॅम एमडी खरेदी केली होती. पोलिसांनी अटकेतील तिघांना बुधवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांची पोलिस कोठडीत रवानगी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT