नागपूर

नागपूर : नेत्ररोग तज्ज्ञांची ६,७ जानोवारीला परिषद, देशभरातून ६०० तज्ज्ञ येणार

अविनाश सुतार

नागपूर, पुढारी वृत्तसेवा :  विदर्भ ऑपथालमीक कॉन्फरन्स 'आयस्पायर' येत्या 6 व 7 जानेवारी रोजी नागपुरातील एम्स रुग्णालयात आयोजित करण्यात आली आहे. नेत्ररोग तज्ज्ञांच्या 50 वर्षे जुन्या संस्थेमार्फत आयोजित ही 48 वी परिषद असून देशभरातून 600 वर डॉक्टर प्रतिनिधी या परिषदेसाठी नागपुरात येत आहेत. ऑल इंडिया ऑपथालॉजिकल सोसायटीचे अध्यक्ष डॉ हरबंशलाल, नवी दिल्ली हे या परिषदेचे मुख्य आकर्षण असणार आहेत.

याशिवाय मुंबईचे डॉ. तात्याराव लहाने आणि एम्सच्या डॉ. मृणाल फाटक यांचा समावेश आहे. या समारंभात अरविंद नेत्र रुग्णालय मदुराई येथील डॉ उषा किम यांना दिवंगत डॉ नीलिमा पावडे जीवन गौरव पुरस्कार, चंदीगड येथील डॉ. जसप्रीत सुखीजा यांना डॉ. आर.एन.गंधेवार पुरस्कार तर नारायण नेत्रालय बंगळूरु येथील डॉ. पूजा खामारे यांना यंग आचिव्हर्स पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस एम्स येथे होणारी ही परिषद देशभरातून येणाऱ्या नेत्ररोग तज्ञांसाठी विशेष ठरेल असा विश्वास विदर्भ ऑपथालमीक सोसायटीचे अध्यक्ष डॉ राजेंद्र विश्वकर्मा, संघटक अध्यक्ष डॉ रफत खान व आयोजन सचिव डॉ. कृष्णा भोजवानी यांनी पत्रपरिषदेत व्यक्त केला.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT