Nagpur Judge Residence Snake Rescue Pudhari
नागपूर

Nagpur Cobra Rescue | नागपूर : न्यायाधीश निवासस्थानातून पाच फुटी नागाचे थरारक रेस्क्यू

सर्पमित्र शुभम पराळे आणि श्रेयांश येवले यांची तत्परता

पुढारी वृत्तसेवा

Nagpur Judge Residence Snake Rescue

नागपूर : नागपूर येथील नवीन न्यायाधीश निवासस्थानी परिसरात मंगळवारी (२५ ऑगस्ट) रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास अंदाजे पाच फूट लांबीचा इंडियन कोब्रा (नाग) आढळून आल्याने परिसरात काही काळ घबराटीचे वातावरण निर्माण झाले. न्यायाधीश निवासस्थानील गेटजवळच नाग आढळल्याने उपस्थितांमध्ये भीतीचे वातावरण होते.

नाग आढळून येताच न्यायाधीश पाटील यांनी तत्काळ सर्पमित्र शुभम पराळे यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच शुभम पराळे हे अवघ्या दहा मिनिटांत घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्यासोबत सर्पमित्र श्रेयांश येवलेही उपस्थित होते. गेटजवळील एका कोपऱ्यात नाग असल्याचे दिसून येताच शुभम पराळे यांनी सुरक्षित पद्धतीने सापाला बाहेर काढून रेस्क्यू केले.

रेस्क्यू केलेल्या नागाच्या पोटाचा भाग फुगलेला असल्याचे निदर्शनास आले. त्याने नुकताच उंदीर गिळल्याचे दिसून आले. काही वेळाने त्याने गिळलेला उंदीर बाहेर काढला. त्यानंतर सर्पमित्रांनी नागाला काळजीपूर्वक भरणीत बंदिस्त केले.

नागाला कोणतीही इजा न करता रेस्क्यू केल्यानंतर सर्पमित्र श्रेयांश येवले यांनी त्याला सिव्हिल लाइन्स येथील वनविभागाच्या ट्रांझिट सेंटरमध्ये सुरक्षितपणे नेले. तेथून पुढील कार्यवाही करण्यात आली.

दरम्यान, सर्पमित्रांच्या तत्परतेमुळे मोठा धोका टळला. परिसरात न्यायाधीश तसेच त्यांची मुलेही उपस्थित असल्याने नाग आढळल्याने काही काळ चिंता निर्माण झाली होती. मात्र, सर्पमित्रांनी वेळ न दवडता घटनास्थळी पोहोचून नागाचे सुरक्षित रेस्क्यू केल्याने सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT