Nagpur news 
नागपूर

Nagpur news | विरोधकांचा चहापानावर बहिष्कार, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र ? वडेट्टीवार यांचा सवाल

Maharashtra Assembly Winter Session updates|विरोधी पक्षनेते पद, संविधानावरील सरकारचा अविश्वास, मनुस्मृती जपणारं सरकार....; असे एक नाही अनेक प्रश्न सरकारविरोधात उपस्थित

पुढारी वृत्तसेवा

नागपूर : विधिमंडळ इतिहासात दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेते पदाची दोन्ही संविधानिक पदे रिक्त आहेत. संविधानावर अविश्वास दाखवणारं, मनुस्मृती जपणारं हे सरकार आहे? असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित करत, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? असा सवाल विरोधकांनी सत्ताधारी सरकारविरोधात उपस्थित केला. आम्हाला सरकारसोबत चहापान करायचे नाही; अशी बहिष्काराची भूमिका काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार यांनी आज रविवारी (दि.7) पत्रकारपरिषदेत स्पष्ट केली.

लाडक्या बहिणीना 2100 रुपये नाहीत, अनेक नमो ....योजनाची घोषणा झाली पण योजना थंडबस्त्यात आहेत. तिजोरी लुटीसाठीच तिघांची भांडणे सुरू आहेत. आमदार मतदान केंद्रावर धमकावतात....कुठे नेऊन ठेवला वर्षभरात महाराष्ट ? असा सवाल वडेट्टीवार यांनी केला. 1,67 लाख कोटींची कामे 9 लाडक्या कंत्राटदारांना दिली. काही कामे 33 टक्के अबाव्ह अशी नियमबाह्य कामे जोरात सुरू आहेत. कोल वॉशरीजचा मोठा घोटाळा आहे. विदर्भाच्या हक्काचे 1200 कोटी वळवले या सर्व प्रश्नी श्वेतपत्रिका काढण्याची मागणी करणारे पत्र सरकारला दिले असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले. सत्ताधारी पक्षाकडून मनमानी सुरू असून घटनात्मक पद रिक्त ठेवत वैयक्तिक चहापान निमंत्रण हे दुर्दैव असल्याचे भास्कर जाधव म्हणाले. यावेळी अनिल देशमुख, नितीन राऊत, ऍड अनिल परब, सुनील प्रभू, अभिजित वंजारी, सुनील लोंढे उपस्थित होते.

वडेट्टीवार म्हणाले, कर्जमाफी देऊ असे सांगून शेतकऱ्यांची मते घेतली पण कर्जमुक्तीचा पत्ता नाही. तारीख पे तारीख सुरू आहे. 1980 मध्ये 14 तर 1985 मध्ये 16 सदस्य असूनही भाजपला काँग्रेसने विरोधी पक्षनेतेपद दिले. मात्र सरकारला मनमानी कारभार करायचा म्हणून ही पदे रिक्त ठेवली जात आहे. नतभ्रष्ट सरकारचे चुकीचे कापूस धोरणामुळे विदर्भ, महाराष्ट्र शेतकरी संकटात आहे. रोज 8 शेतकरी आत्महत्या करीत असून देशातील एकंदर आत्महत्यापैकी 38.5 टक्के शेतकरी महाराष्ट्रातील आहेत. शेतकऱ्यांना फुकटे म्हणणारे ,अवमान करणारे हे सरकार असून तिजोरी खाली आहे 9 लाख 32हजार कोटीचे कर्ज असून विकासाचा निधी पुणे, ठाणे, मुंबईवर तर 25 टक्के कमिशनवर खर्च होत आहे.

राज्यात भ्रष्टाचार फोफावला आहे. राज्य दिवाळखोरीकडे जात असून मुख्यमंत्री असताना विदर्भाकडे दुर्लक्ष आहे. रोज 24 अल्पवयीन मुलींची छेड काढली जात असून महिला, मुली अत्याचारात राज्य पहिल्या क्रमांकावर असल्याचा आरोप केला. 2021 मध्ये 6728 तर यानंतर सातत्याने 8355,9570,10112 अशी वाढ झाली. लाडक्या लेकी,बहिणींची सुरक्षा करण्यात सरकार अपयशी, विविध हत्या प्रकरणी गुंडांना राजाश्रय असून , पुणे गुंडांचे कॅपिटल हब झाले आहे. वाघ,बिबट्याचे हल्ले वाढले असून 75 मृत्यू झालेत. पशुधन मोठे नुकसान, कंत्राटदारांची बिले थकीत, आत्महत्या केल्या, विदर्भातील युवक रोजगारासाठी इतरत्र जात असून आत्महत्या वाढल्या.11 वर्षे दिल्ली ते गल्ली भाजपची सत्ता पण रोजगार निर्मिती नाही. अदानीच्या घशात 7 लाख कोटींच्या ताब्यात, अटक केलेल्यांना व्हिआयपी ट्रीटमेंट, सरकार कुणाला पाठीशी घालतेय असा सवाल वडेट्टीवार यांनी केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT