नागपूर: उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले आहेत. त्यांनी शेतकऱ्यांकरता काय केले? 2014 पासून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी राज्यातील जनतेला आणि शेतकऱ्यांना वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून मोठा दिलासा दिला आहे. काम न करता, केवळ टोमणे मारणे एवढेच ठाकरे करू शकतात; असा आरोप भाजपनेते गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी केला.
धंगेकर, चंद्रकांत दादा वादावर बोलताना ते म्हणाले, चंद्रकांत दादा मोठे नेते आहेत. त्यांचे सर्वसामान्यांसाठी काम आहे. उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येण्याबाबत बोलताना भोयर म्हणाले, जमिनीवरचा बेस त्यांचा संपला आहे. आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत शेवटची संधी चाचपण्याकरता ते दोघं भाऊ एकत्र येत असावेत.
ओबीसी महामोर्चा निमित्ताने काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मुंबई, पुणे, ठाणे जाम करू असा इशारा सरकारला दिला आहे. याकडे भोयर यांचे लक्ष वेधले असता, "इथले विदर्भातले लोक मेहनत करून आपले घर चालवतात. नागपुरातील मोर्चात त्यांना फारसा प्रतिसाद मिळाला नाही हे त्यांना माहित आहे".