नागपूर

RSS सोबत नागपूरमध्ये २ तासांची बैठक, देवेंद्र फडणवीसांनी पदाधिकाऱ्यांना कोणता सल्ला दिला?

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीस निवासस्थानी गुरुवारी एक बैठक झाली होती. या दरम्यान आरएसएसचे अनेक प्रमुख पदाधिकारी फडणवीस यांच्या निवास्सथानी पोहोचले. या बैठकीनंतर फडणवीस दिल्लीसाठी रवाना झाले होते. पण या बैठकीत काय बोलणे झाले, हे अद्यापपर्यंत समजलेले नाही. लोकसभा निवडणुकीच्या पराभवाची जबाबदारी घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला राजीनामा देण्याची तयारी दर्शवली होती. आता असे वृत्त आहे की, फडणवीस यांनी गुरुवारी जवळपास दोन तास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. या बैठकीनंतर अनेक प्रकारचे कयास लावले जात आहेत.

अधिक वाचा –

नागपूरमध्ये फडणवीसच्या आवासवर गुरुवारी एक बैठक झाली होती. या दरम्यान आरएसएसचे अनेक प्रमुख पदाधिकारी देखील फडणवीस यांच्या निवासस्थान पोहोचले होते. या बैठकीनंतर फडणवीस दिल्लीसाठी रवाना झाले होते. पण, या बैठकीत काय बोलणे झाले, हे समजलेले नाही. या बैठकीविषयी कयास लावला जात आहे की, आरएसएसच्या पदाधिकाऱ्यांना फडणवीस यांना काही निर्देश वा सल्ला दिला असावा.

अधिक वाचा –

काय म्हटलं होतं देवेंद्र फडणवीसांनी?

देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात भाजपच्या खराब प्रदर्शनाची जबाबदारी घेत दोन दिवस आधी उपमुख्मंत्री पदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली होती. त्यांनी एक वक्तव्य केलं होतं की, महाराष्ट्रात भाजपला जो धक्का बसला आहे, त्याची संपूर्ण जबाबदारी मी घेतो. कारण पक्षाचे नेतृत्व मी करत होतो. मी विधानसभा निवडणुकीत राज्यासाठी भारतीय जनता पार्टीसाठी संपूर्ण वेळ देऊ इच्छितो.

अधिक वाचा –

SCROLL FOR NEXT