कंगना रनौत यांना थप्पड लगावल्यानंतर काय म्हणाला CISF गार्डचा भाऊ?

Kangana Ranaut
Kangana Ranaut
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : कंगना रनौत यांना थप्पड मारणाऱ्या कुलविंदर कौरच्या भावाची प्रतिक्रिया आली आहे. भाजपच्या नवनिर्वाचित खासदार कंगना राणौतला चंदीगड विमानतळावर CISF च्या महिला गार्डने थप्पड मारली. आता या गार्डचे निलंबित करण्यात आले असून तिच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आले आहे. विमानतळाच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या सीआयएसएफनेही या घटनेसंदर्भात 'कोर्ट ऑफ इन्क्वायरी'चे आदेश दिले आहेत. तसेच कुलविंदर कौर हिचे निलंबित करण्यात आले आहे. दरम्यान, या प्रकरणावर या CISF महिला गार्डच्या भावाची प्रतिक्रिया आलीय.

या प्रकरणावर कुलविंदर कौरचा भाऊ शेर सिंह महिवाल यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. शेरसिंह महिवाल म्हणाले, "चंदीगड विमानतळावर काहीतरी घडल्याचे मला मीडियाच्या माध्यमातून कळले. आता अशी माहिती मिळाली आहे की, कंगनाचा मोबाईल आणि पर्स तपासताना ही घटना घडली आहे. कंगनाने शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान सांगितले होते की, १०० रुपयांत महिला आंदोलनाला आल्या आहेत.

अधिक वाचा-

शेरसिंग महिवाल पुढे म्हणाले, "भांडणानंतर माझी बहीण भावनिकरित्या संतापली असावी, ज्यामुळे अशी घटना घडली. सैनिक आणि शेतकरी दोघेही महत्त्वाचे आहेत आणि प्रत्येक अर्थाने त्यांचे कर्तव्य बजावत आहेत. आम्ही त्यांना यामध्ये पूर्ण सहकार्य करू."

अधिक वाचा-

मीडिया रिपोर्ट्सनुसार, शेर सिंह महिवाल गावचा शेतकरी नेता आहे. किसान मजदूर संघर्ष समिती कपूरथळामध्ये संघटन सचिवपदाची जबाबदारीही त्यांनी सांभाळली आहे. तर कुलविंदर कौर दोन वर्षांपासून चंदीगड विमानतळावर तैनात आहेत. कुलविंदर कौर जवळपास दोन वर्षांपासून चंदीगड विमानतळावर तैनात आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या घटनेपूर्वी त्याचा सर्व्हिस रेकॉर्ड चांगला होता. त्यांच्या १५ वर्षांच्या सेवेत असे एकही प्रकरण समोर आलेले नाही. ३५ वर्षीय कुलविंदर पंजाबमधील कपूरथला जिल्ह्यातील सुलतानपूर लोधी येथील आहे. कुलविंदर कौरचा पतीही CISS मध्ये आहे. त्यांना दोन मुलेही आहेत.

अधिक वाचा-

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news