चंद्रशेखर बावनकुळे, उद्धव ठाकरे (Pudhari Photo)
नागपूर

Chandrashekhar Bawankule | आम्ही उद्धव ठाकरे हेच हतबल मुख्यमंत्री म्हणून बघितले : बावनकुळेंचा पलटवार

विरोधी पक्षात असताना देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात फिरले. मात्र, उद्धव ठाकरे काचेच्या घरात राहिले

पुढारी वृत्तसेवा

Chandrashekhar Bawankule vs Uddhav Thackeray

नागपूर : उद्धव ठाकरे यांनी हंबरडा मोर्चा काढत देवेंद्र फडणवीस यांना हतबल मुख्यमंत्री म्हणून टीका केली. मुळात आम्ही उद्धव ठाकरे हेच हतबल मुख्यमंत्री म्हणून बघितले. ते मंत्रालयात कधीच येत नव्हते, विरोधी पक्षात असताना देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात फिरले. मात्र, उद्धव ठाकरे काचेच्या घरात राहिले, असा आरोप महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.

देवेंद्र फडणवीस यांच्या सक्षम नेतृत्वात 2029, 2035 आणि 2047 चे महाराष्ट्र व्हिजन तयार केले आहे. या व्हिजनला पुढे नेण्याचे काम आम्ही करत आहोत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी, शेतमजूर पूरग्रस्तांना शेतकरी पॅकेज दिले. इतिहासात कोणत्याच सरकारने इतकी तरतूद केली नाही. शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाऊ नये, यासाठी 32 हजार कोटी देण्याचा निर्णय फडणवीस यांनी घेतला.

ते पुढे म्हणाले की, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून नागपुरात नेहमीप्रमाणे खासदार सांस्कृतिक महोत्सव होत आहे. आज भूमिपूजन झाले. यामध्ये शहरातील एक लक्ष परिवार आनंद घेतात. देशातील सर्वात मोठा खासदार सांस्कृतिक महोत्सव अशी ओळख मिळली आहे.

उद्धव राज- एकत्र येण्याचे स्वागतच

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे पारिवारिक भाऊ आहेत. दिपावलीच्या पावन पर्वावर परिवार एक आलाच पाहिजे. सर्व बहिण भाऊ एकत्र आले पाहिजेत. यात माझ्यासारख्या कार्यकर्त्याला काहीही अडचण नाही.

कबूतरखाना वाद संदर्भात बोलताना यावर फार राजकारण करणे योग्य नाही. कोर्टाच्या आदेशाचे पालन सरकारला करायचे आहे. जैन समाजाच्या भावना मला सरकार म्हणून सांभाळायच्या आहेत. कोर्टाचे आदेशाचे पालन करायचे आहे. कुणाच्या भावनेचा अनादर होणार नाही. राज्यात कुठल्याही प्रकारचे वातावरण खराब होणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बिहार राज्याचे केंद्रीय निवडणूक बोर्डाचे सदस्य असल्याने ते दिल्लीला गेले असल्याचे त्यांनी सांगितले.

जिंकू शकेल तोच उमेदवार

जो जिंकू शकेल आणि त्याच्या मागे समाज उभा आहे. हा व्यक्ती निवडून आला पाहिजे. रात्री बेरात्री मदत करेल, अशी भावना असेल त्याला जनता निवडून देईल, चांगला लोकसेवक उमेदवार व्हावा, यासाठी लोकसेवक सारखे उमेदवार आम्ही देणार आहोत.

कामठी येथील वादग्रस्त जागा

जमीन गावाच्या डेव्हलपमेंटसाठी दिली होती.पूर्ण गाव त्यांनी दत्तक घेतले आहे.भुगाव ग्रामपंचायतकडून व्यवस्था केली जाणार आहे. शेतकरी कशा पद्धतीने उत्पादन वाढवतील, त्यासाठी एक मॉडेल तयार करत आहे. त्या जागेची परमिशन घेतली नसल्याने सरपंचाने ते कागदपत्र कॅन्सल केले असे स्पष्ट केले.

उद्या नागपूर अमरावती बैठक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, राष्ट्रीय संघटन मंत्री शिवप्रकाश आणि आम्ही अमरावती विभागाची जिल्हास्तरीय बैठकी घेणार आहे. नागपूर येथे जिल्हास्तरीय बैठक उद्या नागपुरात होणार आहे. अमरावती विभागमध्ये सकाळी बैठक होणार आहे.

ही बैठक शेतकरी पॅकेजचा शेतकऱ्यांना लाभ मिळवून देणे यादृष्टीने महत्वाची आहे. महायुतीचा कार्यकर्ता शेतकऱ्यांच्या मदतीला उतरला पाहिजे. सोबतच येणाऱ्या निवडणुकीत महायुतीची काय तयारी याचीही चर्चा होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT