नागपूर

Ramtek Lok Sabha constituency : शिवसेनेच्या रामटेक लोकसभा मतदारसंघावर भाजपचा दावा  

अविनाश सुतार

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : महायुतीचे जागावाटप अद्याप निश्चित झाले नसले तरी भाजप सर्वाधिक जागा लढविताना शिंदे गट आणि अजित पवार गटाला अपेक्षेप्रमाणे जागा देण्यास तयार नसल्याने शीतयुद्ध सुरू झाले आहे. अलीकडेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा व खासदार श्रीकांत शिंदे यांनी रामटेक शिवसेनाच लढणार, अशी भूमिका जाहीर केली असताना भाजपने पुन्हा एकदा रामटेक लोकसभा मतदार संघावर दावा ठोकला आहे. Ramtek Lok Sabha constituency

याविषयी मागणीचा प्रस्ताव केंद्रीय निरीक्षकांकडे दिल्याची माहिती भाजपचे जिल्हा अध्यक्ष सुधाकर कोहळे यांनी माध्यमांशी बोलताना दिली. शनिवारी डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात भाजप संघटनात्मक क्लस्टर बैठकीअंतर्गत रामटेक लोकसभेचा आढावा घेण्यात आला. यावेळी हा प्रस्ताव देण्यात आला. सध्या रामटेकमध्ये शिंदे गटाचे खासदार कृपाल तुमाने आहेत. मात्र, शिवसेना देखील रामटेकवर दावा करत असल्याने महायुतीचा रामटेकवरून पेच कायम असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. Ramtek Lok Sabha constituency

एकदा नव्हे चारदा आम्ही मित्रपक्षाला ताकद दिली, आता आम्हाला कमळ चिन्हावरचाच खासदार हवा, ही सामान्य कार्यकर्त्यांची भूमिका आहे. या ठिकाणी 90 टक्के भाजपची तर केवळ 10 टक्के मित्रपक्ष शिवसेनेची संघटना, ताकद असल्याचा दावाही कोहळे यांनी केल्याने भाजप नवा चेहरा देणार का ? , रामटेकच्या जागेवर शिंदे गट पाणी सोडणार की भाजप विद्यमान खासदारांच्या हाती कमळ देणार ? याविषयीची चर्चा आता रंगली आहे.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT