नागपूर

Arun lakhani nagpur bjp| खा. सुप्रिया सुळे यांचे व्याही अरुण लखानी होणार भाजपचे आमदार?

विधान परिषद निवडणुकांसाठी आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस

पुढारी वृत्तसेवा

Maharashtra vidhan parishad election 2026

नागपूर : शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांचे व्याही नागपुरातील प्रसिद्ध उद्योजक अरुण लखानी भाजपचे आमदार होणार आहेत. भाजपने जाहीर केलेल्या 11 उमेदवारांमध्ये वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली मतदारसंघातून विधान परिषदेसाठी त्यांना उमेदवारी दिली आहे.

भाजप, संघाशी जवळीक असल्याने त्यांच्या नावाची गेले काही दिवस चर्चा होती. 'पुढारी'ने हे वृत्त दिले होते. विशेष म्हणजे ही निवडणूक मतदानापूर्वीच जोरात चर्चेत आहे. काँग्रेसचे अनेक नगरसेवक भाजपच्या गळाला लागले असून नॉट रिचेबल आहेत. आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असून मतदार योग्य उमेदवाराची निवड करतील. मी लगेच प्रचार सुरू करणार आहे. बाकी विषयात मला बोलायचे नाही. आपल्याला ही संधी दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाध्यक्ष नितीन नवीन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आदींचे त्यांनी माध्यमांशी बोलताना आभारही मानले.

अरुण लखानी यांचे सुपुत्र सारंग आणि खासदार सुप्रिया सुळे यांची मुलगी रेवती यांचा लवकरच विवाह होणार आहे. एकप्रकारे या कुटुंबासाठी ही दुसरी गोड बातमी आहे. स्वतः सुप्रिया सुळे यांनी देखील अरुण लखानी यांचे भाजपच्या उमेदवारीसाठी अभिनंदन देखील केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन ज्येष्ठ उद्योजक अरुण लखानी यांनी आपले चिरंजीव सारंग यांच्या विचाहाचे निमंत्रण त्यांना दिले. यावेळी लखानी कुटुंबातील सदस्य तसेच सारंग यांच्या वाग्दत्त वधू रेवती आणि खा. सुप्रियाताई सुळे प्रामुख्याने उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT