IndiGo flight Bomb Threat
ओमानची राजधानी मस्कट ते कोची- दिल्ली इंडिगो विमानात (Flight 6E 2706) बॉम्ब ठेवल्याची धमकी मिळाली. यामुळे या विमानाचे मंगळवारी सकाळी नागपूर विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. सर्व प्रवाशांना विमानातून सुरक्षितपणे खाली उतरवण्यात आले आहे. याची चौकशी सुरू आहे. या प्रकरणी अद्याप काहीही संशयास्पद आढळून आलेले नाही.
पोलिस उपायुक्त (DCP) लोहित मतानी यांनी दिलेल्या माहितीनुसार, या विमानाच्या इमर्जन्सी लँडिंगनंतर सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे विमानातून खाली उतरवण्यात आले. या प्रकरणी विमानतळ सुरक्षा आणि बॉम्ब निकामी पथकांकडून तत्त्काळ सखोल चौकशी सुरू करण्यात आली.
आतापर्यंतच्या चौकशीत काहीही संशयास्पद आढळले आलेले नाही, अशी पुष्टी डीसीपी मतानी यांनी केली. दरम्यान, सुरक्षेबाबत खबरदारी उपाययोजनांचे काटेकोरपणे पालन केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
कोची आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड (CIAL) ने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी मस्कट येथून दिल्लीला येणाऱ्या इंडिगोच्या विमानात बॉम्ब असल्याची धमकी मिळाली. यासाठी सुरक्षेबाबत खबरदारी म्हणून या विमानाचे तपासणीसाठी नागपूर विमानतळावर इर्मजन्सी लँडिंग करावे लागले. या विमानात १५७ प्रवासी ६ क्रू मेंबर्स आहेत. सुरक्षेबाबत तपासणी पूर्ण केल्यानंतर हे विमान दिल्लीला रवाना होईल, असे सांगण्यात आले आहे.
याधी हैदराबादला येणाऱ्या लुफ्थांसा विमानाला विमानाला बॉम्बची धमकी मिळाली होती. यामुळे त्याला माघारी परतावे लागले, असे हैदराबाद विमानतळाच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी सांगितले. हे विमान भारतीय हवाई हद्दीबाहेर असताना त्याला बॉम्बची धमकी मिळाली. यामुळे हे विमान ज्या ठिकाणाहून आले आहे तेथे त्याला माघारी जावे लागले.