Chandrashekhar Bawankule  Pudhari Photo
नागपूर

Amaravati News | ‘विचारा इस्लाम’ प्रकाराची कसून चौकशी, पालकमंत्र्यांचे आदेश!

पोलिस आयुक्तांकडून मागवला अहवालः दोषींवर कडक कारवाई होणार

पुढारी वृत्तसेवा

नागपूर - अमरावती शहरात लागलेल्या विचारा इस्लाम या पोस्टरची गंभीर दखल राज्याचे महसूलमंत्री व अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतली असून, पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांना अहवाल मागितला असून दोषींवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले.

कोणत्याही स्थितीत अमरावतीचे सामाजिक वातावरण बिघडता काम नये.जे असे प्रयत्न करत असतील त्यांच्यावर कारवाई करा. अमरावतीमध्ये काही महिन्यांपूर्वी आय लव मोहम्मद असे आशयाचे पोस्टर लावण्यात आले होते. त्यानंतर आता विचारा इस्लाम या आशयाचे पोस्टर दिसत आहेत, हा प्रकार अयोग्य आहे. कोणीही कायदा हाती घेऊ नये. शहरातील पंचवटी चौक भागात हा उपद्रव केला आहे. अनेक ठिकाणी पोस्टर्स लावण्याचा प्रकार कानावर येतो आहे. विचारा इस्लाम या पोस्टरखाली एक टोल-फ्री नंबर लिहिला आहे. तो नंबर हैदराबाद आणि चेन्नईवरून ऑपरेट होत असल्याची माहिती मिळाली आहे. पोस्टरवर आयसीसी असे लिहिलेले आहे, हा काय प्रकार आहे, असा प्रश्न त्यांनी आयुक्तांना विचारला.

राजधानीतील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अशा पद्धतीचे पोस्टर कोणत्याही स्वरूपात खपवून घेतले जाणार नाहीत. हे पोस्टर लावण्यामागे कोणता हेतू आहे, हे तपासा असे सांगून पालकमंत्री बावनकुळे यांनी आयुक्तांना विचारले की, पोलिसांनी परवानगी दिली का? महापालिकेकडून परवानगी घेतली का? याचा तपास करून मला अहवाल द्या, असे सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT