

BJP vs INDIA Alliance
नागपूर: आपल्या तक्रारी घेऊन निवडणूक आयोगाकडे जाणे हा प्रत्येक राजकीय पक्षाचा अधिकार आहे. मात्र काँग्रेससह इंडिया आघाडी आतापासूनच पराभूत मानसिकतेत आहेत. दुसरीकडे महायुती ५१ टक्के मतांसह विजयी होईल, असा दावा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. निवडणूक आयोगाकडे आम्ही देखील आक्षेप घेतले होते, यावर त्यांनी भर दिला.
रेती उपलब्धतेसाठी शासनाने नवे धोरण लागू केले असून, “तीन महिन्यांपासून रेती बंद होती. आता ५०० हून अधिक घाटांचा लिलाव करण्यात येणार आहे.
नावापेक्षा काम महत्त्वाचे, काँग्रेसवर टीका
दरम्यान, सायन्स सेंटरच्या नावाबाबत काँग्रेसकडून होत असलेल्या टीकेला उत्तर देताना बावनकुळे म्हणाले, हे नाव आधुनिक आणि विकसित भारताचे प्रतीक आहे. नेहरू सेंटर का नाही दिले यावर वाद घालण्यात अर्थ नाही. नावापेक्षा काम महत्त्वाचे आहे, असा टोला त्यांनी लगावला.