विदर्भ

नागपूर : कौटुंबिक हिंसाचाराने उपराजधानी हादरली, वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन महिलांचा खून

backup backup

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : उपराजधानी नागपूरमध्ये गेल्या २४ तासात दोन खूनाच्या घटना घडल्या. पाणी भरण्यास नकार दिल्यामुळे पती-पत्नीमध्ये वाद झाला. हा विकोपाला गेला आणि पतीने पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाड घालून खून केला. दुसरीकडे पैशावरुन झालेल्या भांडणात पतीने पत्नीच्या डोक्यात सिलेंडर घालून खून केल्याची घटना घडली.

याबाबत अधिकची माहिती अशी की, हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत टेकअप सिटी येथील एका फ्लॅटमध्ये समीर मोहम्मद हनीफ हंसारी (वय ४८) व त्याची पत्नी नायरा शफी खान (वय ३५) हे भाड्याने रहात होते. दोन दिवसांपूर्वी त्यांच्यात पैशावरून खडाजंगी झाली, समीर हंसारी यांच्या पत्नीला आरोग्यविषयक तक्रारी असल्याने नेहमीप्रमाणे सोमवारीही दोघांत भांडण झाल्याने समीर रागातच होता. रात्री दीड ते दोन वाजताच्या सुमारास त्याने पत्नी झोपेत असतांना तिचा डोक्यावर चार-पाच वेळा सिलेंडर घातले व पुन्हा झोपी गेला. सकाळी आरोपी स्वतःहून वाथोडा पोलिस ठाण्यात हजर झाला. दरम्यान, घटनास्थळ हुडकेश्वर हद्दीत असल्याने पोलीस आरोपीच्या घरी पोहचले. रक्तबंबाळ अवस्थेत पत्नी मृतावस्थेत पडून होती.

दरम्यान, कोराडी हद्दीत दुसऱ्या घटनेत मुकुल कुमारी सिन्हा (६३) असे मृत महिलेचे नाव आहे. तर पुरुषोत्तम कुमार सिंह (६५) असे आरोपीचे नाव आहे. मुकुल कुमारी या केंद्रीय विद्यालयात शिक्षिका होत्या. तर पती पुरुषोत्तम कुमार केंद्र शासनाच्या सीएमपीडीआय विभागात मुख्य व्यवस्थापक पदावर कार्यरत होते. लग्न झाल्यापासूनच हे दोघेही चारित्र्यावर संशय घेत होते. मुकुल कुमारी यांचे शाळेच्या मुख्याध्यापकासोबत प्रेमसंबंध असल्याचा आरोप पुरुषोत्तमचा होता. अखेर हा वाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात पोहचला. काही वर्षानंतर ते पुन्हा एकत्र आले. त्यांना दोन मुले आणि एक मुलगी असून सर्व नोकरीवर आहेत. हे दोघे पती-पत्नी शंभूनगरात राहत होते. रविवारी सकाळी पत्नीने पाणी भरण्यास सांगितल्यामुळे पतीला राग आला, त्यावरून दोघांत वाद व धक्काबुक्की झाली. पती पुरुषोत्तम याने घरातून कुऱ्हाड आणली आणि पत्नीच्या डोक्यात घातली. पत्नीचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी कोराडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.

हेही वाचंलत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT