

भारत ७७ वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यात तिरंगी बर्फीचेही योगदान असल्याचे म्हटले जाते. स्वातंत्र्यदिनी ध्वजवंदन झाल्यानंतर मिळणारी तिरंगी बर्फीची चव आजही आपल्या जीभेवर रेंगाळत असेल. स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये शहीद ते सामान्य जनतापर्यंत प्रत्येकाने आपल्या आपल्या पातळीवर योगदान दिलं होतं. तिरंगी बर्फीदेखील स्वातंत्र्याच्या लढाईत आपली एक वेगळी ओळख निर्माण करून गेली. बनारसमध्ये १८५० मध्ये पहिल्यांदा तिरंगी बर्फी बनण्याची सुरुवात झाली होती. त्यानंतर देशाच्या इतिहासात या तिरंगी बर्फीने एक वेगळी ओळख बनवली. ही तिरंगी बर्फी आपणही घरी बनवू शकतो, त्याची रेसिपी आपण पुढे पाहणार आहोत.
बनारसच्या ठठेरी बाजारात प्रसिद्ध राम भंडारच्या भिंतीमागे पहिल्यांदा तिरंगी बर्फी बनवण्यात आली. आणि स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये ही खास मिठाई राष्ट्रीय बर्फीच्या रूपात खूप ओळख मिळाली. असे म्हटले जाते की, जेव्हा सरकारद्वारा वृत्तपत्रांचे वितरण बंद करण्यात आले होते, तेव्हा शहरांच्या भिंतींवरही आपले विचार व्यक्त करण्यास मनाई होती. त्यावेळी बनारसमध्ये बर्फी तयार झाली.
[saswp_tiny_recipe recipe_by="स्वालिया शिकलगार" course="डेझर्ट" cusine="भारतीय" difficulty="सोपी" servings="५" prepration_time="१०" cooking_time="२०" calories="" image="617244" ingradient_name-0="सुजी – ३ चमचे" ingradient_name-1="तूप – ३ चमचे" ingradient_name-2="पांढरे चॉकलेट – अर्धा कप किसलेले" ingradient_name-3="दूध" ingradient_name-4="खोबरे – १ कप ताजे किंवा सुखलेले" ingradient_name-5="वेनीला इसेंस – १ चमचा" ingradient_name-6="साखर – ३ चमचे" ingradient_name-7="ग्रीन आणि ऑरेंज फूड कलर" direction_name-0="प्रथम एका कढईमध्ये तूप गरम करून त्यात सूजी घालून भाजून घ्या." direction_name-1="सुजीचा हल्का ब्राऊन कलर आला की, त्यामध्ये दूध आणि चॉकलेट घालून मिश्रण करून घ्या." direction_name-2="मग त्यात खोबरे आणि साखर घालून एकजीव करून घ्या. वरून वेनीला इसेंस देखील घाला." direction_name-3="मंद आचेवर हे मिश्रण भाजत राहा. मिश्रण कढईला चिकटणार नाही, याची काळजी घ्या." direction_name-4="हे मिश्रण एका प्लेटमध्ये काढून घ्या आणि ३ भागात विभागून घ्या." direction_name-5="एका भागात ग्रीन कलर फूड आणि दुसऱ्या भागात ऑरेंज फूड कलर घाला. तिसरा भाग तसाच राहू द्या." direction_name-6="पुढे एका चौकोनी ताटात बटर पेपर ठेवा. ताटात आधी हिरव्या रंगाचे मिश्रण पसरवून घ्या." direction_name-7="त्यावर पांढऱ्या रंगाचे बर्फीचे मिश्रण (ज्यामध्ये कलर घातलेला नाही तो भाग) पसरवून घ्या." direction_name-8="शेवटी ऑरेंज कलरचे मिश्रण पसरवून घ्या. फ्रिजमध्ये अर्ध्या तासासाठी ठेवून सेट करून घ्या." direction_name-9="अर्धा तासांनी मिश्रण फ्रिजमधून बाहेर काढून एका प्लेटमध्ये काढून घ्या." direction_name-10="चाकूच्या सहाय्याने वड्या कापून घ्या. त्यावर चॉकलेट सिरप देखील तुम्ही टाकू शकता." notes_name-0="" html="true"]