विदर्भ

नागपूर : मसाला भरलेल्या ट्रकला आग, ३८ लाखांचे नुकसान

backup backup

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : नागपूर -भंडारा रोडवर शनिवार (दि.११) सायंकाळच्या सुमारास सुरुची मसाले कंपनीचा एक ट्रक जळून खाक झाला. या ट्रकमध्ये मसाल्यात वापरले जाणारे तेजपान होते. याआगीत सुमारे ३८ लाख रुपयांचे तेजपान जळून खाक झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. वायरिंगच्या शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचे बोलले जाते. आग लागलेल्या ट्रकचा क्रमांक एम एच 30,-4422 उमिया धाम नाका नंबर ५ परिसरात हा ट्रक उभा असताना अचानक ही आग लागली.

वर्दळीचा महामार्ग असल्याने ट्रकमधून निघत असणारा धूर पाहून रस्त्याच्या दोन्ही बाजूने गर्दी झाली. ट्रक मालक अब्दुल नजीम भाई तर ट्रक ड्रायव्हर अमजद खान असून आंध्र प्रदेशातून हा ट्रक आल्याची माहिती आहे. मसाल्याचे साहित्य घेऊन आलेला हा ट्रक भंडारा रोडवरील सुरुची कंपनीकडे निघाला होता. मात्र, त्यापूर्वीच आग लागल्याने मोठी हानी झाली. अग्निशमन दलाच्या कळमना गाडी क्रमांक 569, लकडगंज अग्निशमन स्थानकाच्या गाडी क्रमांक 492 यांनी तातडीने धाव घेत ही आग नियंत्रणात आणली. यामुळे सुमारे दहा लाख रुपयांचा माल बचावला अशी माहिती मिळाली.

हेही वाचलंत का?

SCROLL FOR NEXT