Virat Kohli : अर्धशतकी खेळीने विराटच्‍या नावावर आणखी एक विक्रम, अशी कामगिरी करणारा ठरला चौथा भारतीय फलंदाज | पुढारी

Virat Kohli : अर्धशतकी खेळीने विराटच्‍या नावावर आणखी एक विक्रम, अशी कामगिरी करणारा ठरला चौथा भारतीय फलंदाज

पुढारी ऑनलाईन डेस्क : विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटीत दीर्घकाळानंतर अर्धशतक झळकावले. कोहलीने ५ चौकार लगावत आपले अर्धशतक पूर्ण केले. या खेळीने त्याने एक खास विक्रम आपल्या नावावर केला आहे. सामन्यात कोहलीने देशांतर्गत कसोटी सामन्यांमध्ये ४ हजार धावांचा टप्पा पार केला आहे. अशी कामगिरी करणारा तो पाचवा भारतीय फलंदाज ठरला आहे. (Virat Kohli)

देशांतर्गत कसोटी सामन्यांमध्ये चार हजार धावांचा टप्पा पार करणारा विराट कोहली हा पाचवा भारतीय फलंदाज ठरला आहे. त्याने हा विक्रम ५० सामन्यांच्या ७७ डावांमध्ये केला आहे. त्याने कसोटीमध्‍ये १३ शतके आणि १२ अर्धशतके झळकावली आहेत. यामध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या नाबाद २५४ अशी आहे. देशांतर्गत कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत  माजी फलंदाज सचिन तेंडुलकर पहिल्या क्रमांकावर आहे. त्याने मायदेशात ९४ कसोटी सामन्यांच्या १५३ डावांमध्ये २२ शतके आणि ३२ अर्धशतकांच्या मदतीने एकूण ७२१६ धावा केल्या आहेत. (Virat Kohli)

कसोटीत दीर्घकाळानंतर अर्धशतक

कसोटी क्रिकेटमध्ये प्रदीर्घ कालावधीनंतर विराट कोहलीने अर्धशतक झळकावले. यापूर्वी, जानेवारी २०२२ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात त्याने १२ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ७९ धावांची खेळी केली होती. यानंतर वर्षभरानंतर त्याने कसोटी क्रिकेटमध्ये अर्धशतक झळकावले आहे.

 ४ हजार धावांचा टप्पा पार करणारे भारतीय फलंदाज

  • सचिन तेंडुलकर – ७२१६ धावा
  • राहुल द्रविड – ५५९८ धावा
  • सुनील गावस्कर – ५०६७ धावा
  • वीरेंद्र सेहवाग – ४६५६ धावा
  • विराट कोहली – ४००० धावा

हेही वाचा;

Back to top button