नागपूर, पुढारी वृत्तसेवा: कर्नाटकमधील बेळगाव जिल्ह्यात जैन समाजाचे आचार्य श्री कामकुमार नंदीजी महाराज यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. याच्या निषेधार्थ आज (दि.१३) गांधी पुतळा चौकापासून संविधान चौकापर्यंत शांती मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात हजारो जैन समाज बांधव सहभागी झाले होते.
भारत वर्षीय दिगम्बर जैन तीर्थक्षेत्र कमिटी आणि सकल जैन समाजाच्या वतीने या मोर्चाचे आयोजन केले. संविधान चौकात या मोर्चाचे भव्य सभेत रूपांतर झाले. दोषींना कठोर शासन व्हावे, आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांना दिले.
यावेळी संतोष पेंढारी जैन, महेंद्र सिंघवी, पवन जैन, अतुल कोटेचा, प्रशांत मानेकर, आनंद मौजिलाल, डॉ. रिचा जैन, राकेश पाटनी, पवन झांझरी, अनिल गडेकर आदी उपस्थित होते.
हेही वाचा