नागपूर : एनडीबीबी बुटीबोरीत उभारणार दुग्धजन्य पदार्थ प्रकल्प | पुढारी

नागपूर : एनडीबीबी बुटीबोरीत उभारणार दुग्धजन्य पदार्थ प्रकल्प

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : एनडीबीबी नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरीत सुमारे 500 कोटी रुपये खर्चून दुग्धजन्य पदार्थ प्रकल्प उभारणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. दिल्लीमध्ये केंद्रीय पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय मंत्रालयाच्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांसह ना. गडकरी यांनी आज बैठक घेतली.

विदर्भ आणि मराठवाडा क्षेत्रांतील शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी राष्ट्रीय डेअरी विकास बोर्ड, भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकारच्या संयुक्त विद्यमाने विदर्भ-मराठवाडा दुग्धविकास प्रकल्प राबवण्यात येत आहे. या प्रकल्पामार्फत या क्षेत्रात प्रतिदिन १० लाख लिटर दूध संकलनाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. तसेच एनडीडीबी मार्फत दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या निर्मितीसाठी नागपूरमध्ये जवळपास ५०० कोटींची गुंतवणुक करून बुटीबोरी येथे मेगा मॅन्युफॅक्चरिंग प्लॅंटची उभारणी करण्यात येणार आहे. या बैठकीस सचिव अलका उपाध्याय जी, एनडीडीबीचे चेअरमन मिनेश शहा आणि ज्येष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Back to top button