नागपूर : आमदार बच्चू कडू म्हणाले, अजित पवारांकडे अर्थखाते नकोच!

बच्चू कडू
बच्चू कडू

नागपूर : पुढारी वृत्‍तसेवा काल आमची मुंबईत बैठक झाली, पण मुंबईत राहून मंत्रीपद भेटतंच असं नाही. हा बाजारातून भाजी आणण्याचा किंवा पूजा पाठचा थोडीच विषय आहे, असे म्‍हणत आमदार बच्चू कडू यांनी सध्याच मंत्री मंडळ विस्तार होणार नाही असा अंदाज वर्तविला. आमदार बच्चू कडू यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे अर्थमंत्रीपद देण्यास पुन्हा एकदा विरोध केला आहे. शिंदे गटाचे बंड यावरून झाले, आता पुन्हा ते विरोध करीत असताना अपक्ष बच्चू कडूंनीही नाराजी व्यक्त केली आहे.

विमानतळावर माध्यमांशी बोलताना आमदार बच्चू कडू म्हणाले, सध्या राज्यात तीन इंजनचे सरकार आहे. ते मजबूत पण होवू शकते आणि ते पुन्हा कोसळूही शकते. म्हणूनच जेवढं मजबूत होईल तेवढे मजबूत करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री करतील. खाते वाटपात काही गोष्टी किंतू-परंतू होऊ शकतात, अशी भीती वर्तवितानाच आज प्रत्येकाला असं वाटतं की, अजित पवारांकडे अर्थखातं गेले नाही पाहिजे असे बच्चू कडू यांनी ठासून म्हणाले.

हेही वाचा :  

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news