विदर्भ

नागपूर : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते ‘आयआयएम’च्या नव्या कॅम्‍पसचे उद्घाटन

निलेश पोतदार

नागपूर ; पुढारी वृत्तसेवा

इंडियन इन्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्‍या (आयआयएम) मिहान येथे उभारण्‍यात आलेल्‍या भव्य इमारतीचे आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्‍या हस्‍ते उद्घाटन झाले. या वेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रसाद, सुभाष देसाई, पालकमंत्री नितीन राऊत, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती हाेती.

१३२ एकर भूमीवर 'आयआयएम' नागपूरचे भव्यदिव्य कॅम्पस साकारण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यातील बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे. शहराच्या अगदी शेजारी असलेल्या मिहानमधील एम्स हॉस्पिटलच्या बाजूला आयआयएमची संपूर्ण उभारणी झाली आहे. सध्‍या ६६८ विद्यार्थ्यांना शिक्षणाची व्यवस्था करण्यात आली आहे. पर्यावरणदृष्टया इमारतीची उभारणी करण्यात आली असून, मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड देखील करण्यात आली आहे.

१३२ एकराच्या या प्रकल्पामध्ये व्यवस्थापन आणि आस्थापनाचे महत्त्‍वाचे केंद्र उघडण्यात आले. यात ६६५ विद्यार्थी विविध शाखेमध्ये शिक्षण घेत आहेत. या ठिकाणच्या वर्गखोल्या, त्यांची रचना, जागतिक स्तराच्या प्रशिक्षणाची यंत्रसामुग्रीने या वर्गखोल्‍या सज्ज आहेत. विद्यार्थ्यांसाठी असणाऱ्या अन्य सुविधा देखील दर्जेदार असून, देशभरातील विद्यार्थ्यांची पसंती या संस्थेला मिळत आहे. २०१५ ला सुरु झालेल्या या संस्थेला नव्या कॅम्पसमुळे झळाळी आली आहे.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT