नागपूर : ट्रेलर-कारच्या अपघातात आई वडिलांसह पाच महिन्यांचा चिमुकला जागीच ठार 
विदर्भ

नागपूर : ट्रेलर-कारच्या अपघातात आई वडिलांसह पाच महिन्यांचा चिमुकला जागीच ठार

backup backup

नागपुर, पुढारी वृत्तसेवा : नागपूर-अमरावती महामार्गावरील शिवा फाट्यालगत भरधाव कार ट्रेलरवर आदळून झालेल्या अपघातात कारचालक वडिलांसह पाच महिन्यांचा चिमुकला जागीच ठार झाले. तर पत्नीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यात आठवर्षीय मुलगी गंभीर जखमी आहे. लग्न आटोपून नागपूरला परतताना ही घटना घडली. रोशन रामाजी तागडे (वय २८), पत्नी आंचल रोशन तागडे (२३), राम रोशन तागडे (५ महिने) अशी मृतकांची तर जोया आकाश मेश्राम (८) असे गंभीर जखमीचे नाव आहे.  रोशन रामाजी तागडे हा कळमना पोलीस चौकीजवळ, नागपूर येथे राहायचा. तो ट्रकचालक म्हणून काम करीत होता. कोंढाळी मूळ गाव असल्याने तो कुटुंबासह नातेवाइकांकडे १८ फेब्रुवारीला लग्नासाठी आला होता.

कार्यक्रम आटोपल्यानंतर पत्नी आंचल, मुलगा राम व साडभावाची मुलगी जोया आकाश मेश्राम यांच्यासह कार क्रमांक एमएच ४९/ एफ ०८७५ ने कोंढाळी येथून नागपूरला परतत होते. शिवा फाट्यालगत भरधाव कारसमोरील ट्रेलर क्रमांक एमएच ४०/ बीएल ४२५४ च्या चालकाने अचानक थांबा घेण्यासाठी ट्रेलर वळविला. दरम्यान, कार ट्रेलरच्या आतमध्ये शिरली. या भीषण अपघातात कारचालक रोशन रामाजी तागडे व त्यांचा मुलगा राम हे जागीच ठार झाले. तर पत्नी आंचलचा उपचारादरम्यान नागपूर येथे मेयो रुग्णालयात मृत्यू झाला. आठवर्षीय जोया हिच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे.

अपघाताची माहिती मिळताच ठाणेदार चंद्रकांत काळे, साहाय्यक पोलीस निरीक्षक अजित कदम, भोजराज तांदूळकर, पोलीस नायक प्रशांत काळे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. सामाजिक कार्यकर्ते संजय गायकवाड यांच्या मदतीने कोंढाळी व बाजारगाव येथील वसंतराव देशमुख प्रतिष्ठानच्या दोन रुग्णवाहिकेने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर येथे जखमींना उपचारार्थ हलविण्यात आले. पोलिसांनी आरोपी ट्रेलरचालक राजेश मधुकर ठवरे (४५, पारडी, नागपूर) याला ताब्यात घेतले आहे. ट्रेलर मुंबईवरून लोखंडी कॉईल घेऊन नागपूरला जात होता. तपास साहाय्यक पोलीस निरीक्षक अजित कदम करीत आहे.

हेही वाचलतं का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT