विदर्भ

नागपूर: विदर्भात ढगाळ वातावरण, पारा घसरला

अविनाश सुतार

नागपूर: पुढारी वृत्तसेवा : सलग तीन चार दिवस अकोला, अमरावती आणि नागपूरला या मोसमातील सर्वाधिक तापमान नोंदविण्यात आले. आज (दि.१६) पूर्व विदर्भात गोंदिया सर्वाधिक 42.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. या खालोखाल चंद्रपूरला 42.4 तर अमरावती आणि नागपूरला 41.8 असे तापमान होते.

एकंदरीत विदर्भात उन्हाचा तडाखा वाढला आहे. दुपारी उन्हाच्या झळा असह्य होत आहेत. आज विदर्भातील इतर जिल्ह्यांच्या तापमानाचा विचार करता अकोला (41.7), वर्धा (42.0),ब्रम्हपुरी (41.2), गडचिरोली (41.2), बुलडाणा (38.4), यवतमाळ (39.5) अशी तापमानाची नोंद झाली. ढगाळ वातावरण, पावसाच्या हजेरीने विदर्भात काहीसे तापमान कमी झाल्याचे अनुभवास येत आहे. लग्नसराई जोरात असताना वारंवार वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले असून उकाड्याने जीव कासावीस होत आहे.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT